अनिल परबांवर ED ची कारवाई, उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले..
मुंबई: दापोली रिसॉर्टप्रकरणी अंमलबजावणी संचलनालयाने (ED) राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्याशी संबंधित ठिकाणांवर छापे टाकले आहेत. याचबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आता आपली प्रतिक्रिया दिली आहे. ‘तपास यंत्रणांमध्ये कुणाचाही हस्तक्षेप होता कामा नये. पारदर्शकपणे तपास करण्याकरिता कुणाची ना नाहीए. तो अधिकार कायद्याने आणि नियमाने त्यांना दिला आहे. पण त्याचा गैरवापर होऊ नये एवढी […]
ADVERTISEMENT

मुंबई: दापोली रिसॉर्टप्रकरणी अंमलबजावणी संचलनालयाने (ED) राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्याशी संबंधित ठिकाणांवर छापे टाकले आहेत. याचबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आता आपली प्रतिक्रिया दिली आहे. ‘तपास यंत्रणांमध्ये कुणाचाही हस्तक्षेप होता कामा नये. पारदर्शकपणे तपास करण्याकरिता कुणाची ना नाहीए. तो अधिकार कायद्याने आणि नियमाने त्यांना दिला आहे. पण त्याचा गैरवापर होऊ नये एवढी माफक अपेक्षा आहे.’ असं अजित पवार यावेळी म्हणाले आहेत.
पाहा अजित पवार ईडीच्या कारवाईबाबत काय-काय म्हणाले:
‘केंद्रीय यंत्रणांना जो अधिकार दिला आहे त्याचा ते वापर करतात. मागे पण अनेकांच्या बाबतीत इन्कम टॅक्स, सीबीआय, ईडी यांच्याबाबतच्या कारवाया झालेल्या पाहिल्या आहेत. माझ्याही नातेवाईकांबाबत इन्कम टॅक्सने कारवाया केल्या आहेत.’ असं अजित पवार यावेळी म्हणाले
‘तो त्यांचा अधिकार आहे. त्यांनी धाडी टाकलेल्या होत्या. जो काही त्यांना तपास करायचा होता तो त्यांनी केला. त्याचा अधिकार त्यांना आहे. यामध्ये आत्ताही कारवाई चालू आहे असं मला मगाशी काहींनी सांगितलं. परंतु कोणत्या बेसवर कारवाई चालू आहे हे माहित नाही. कारण मागे पण काही जणांनी सुतोवाच केले होते. अमक्याचा नंबर.. तमक्याचा नंबर.. अशाही गोष्टी काही जणं बोलतात आणि त्या पद्धतीने घडतं.’ असं म्हणत अजित पवारांनी नाव न घेता किरीट सोमय्या यांच्यावर टीका केली आहे.