‘शिंदेंची 33 देशात गद्दार म्हणून ओळख…’ बारसूमध्ये उद्धव ठाकरे बरसले

मुंबई तक

ADVERTISEMENT

eknath shinde has been recognized as a traitor in 33 countries uddhav thackeray venomous criticism of chief minister in barsu
eknath shinde has been recognized as a traitor in 33 countries uddhav thackeray venomous criticism of chief minister in barsu
social share
google news

Uddhav Thackeray Barsu: बारसू (रत्नागिरी): राजापूर तालुक्यातील बारसू (Barsu) येथील रिफायनरीला विरोध करण्यासाठी शिवसेना (UBT) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे स्वत: बारसू येते पोहचले. इथेच त्यांनी रिफायनरीला विरोध करणाऱ्या स्थानिक नागरिकांची भेट घेत आपण या प्रकरणात त्यांच्या पाठीशी असल्याचं सांगितलं. मात्र, यावेळी भाषण करताना त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. सध्या जे मुख्यमंत्री आहेत त्यांची 33 देशात गद्दार म्हणून ओळख आहे. याआधी त्यांना मंत्री म्हणून 3 जिल्ह्यातही कोणी ओळखत नव्हतं. असं म्हणत उद्धव ठाकरेंनी शिंदेंवर सडकून टीका केली. (eknath shinde has been recognized as a traitor in 33 countries uddhav thackeray venomous criticism of chief minister in barsu)

बारसूतील स्थानिकांसमोर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘मला तर असं सांगायचं आहे की, आता जे बसलेत गद्दार आपले तिकडे मुख्यमंत्री… 33 देशामध्ये त्यांची ओळख झालीए गद्दार म्हणून.. पण मार्ग कसा काढायचा असतो हे सांगण्यासाठी मी त्यांचा उल्लेख केला नाहीतर त्यांचा उल्लेख करण्याची गरज नाही. आज या गद्दारांना गद्दार म्हणून 33 देशात ओळख झालीए त्या वेळेला 33 सोडा 3 जिल्हे देखील ओळखत नव्हते मंत्री म्हणून.’

बारसूत उद्धव ठाकरेंची मोदी आणि शिंदेवर सडकून टीका

‘जेव्हा आमचं सरकार होतं त्याआधी नाणार प्रकल्प आपण सगळ्यांनी जोर लावून रद्द करून घेतला त्यानंतर मी मुख्यमंत्री झालो आणि काही जण माझ्यावर आरोप करायला लागले की, कोकणचा विकास यांना नकोय. कोकण यांना संपूर्ण कंगाल करायचाय. कोणत्याही परिस्थितीत हे पाप मी डोक्यावर घ्यायला तयार नव्हतो. आता जे काही दलाल फिरतायेत सुपाऱ्या घेऊन कोणाच्या सुपाऱ्या याची तुम्हाला कल्पना आहे.’

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

‘आज मी मुख्यमंत्री नाहीए. पण आज जरी मी मुख्यमंत्री असतो तरी मी हेच केलं असतं. कारण माझ्यावर आरोप केले जात आहेत की, उद्धव ठाकरेच्या नातेवाईकांच्या इथे जमिनी आहेत. ऐका… हे खरं आहे.. तुम्ही हे सगळे माझे नातेवाईकच आहात.’

‘माझ्याकडे आग्रह धरला की, जे आता सुपाऱ्या घेऊन फिरत आहेत. की, इकडे ओसाड जमीन आहे.. वस्ती कमी आहे विशेष म्हणजे ग्रामपंचायतीने ठराव केला आहे की, इथे रिफायनरी झाली तरी आम्हाला चालेल. तुम्हाला खरं कळलं पाहिजे.. गैरसमज असता कामा नये.. म्हणून आपण प्राथमिक पत्र दिलं. लोकांना मान्य असेल तर इथल्या लोकांशी बोलून जसं मी आज तुमच्याशी बोलतोय.’

ADVERTISEMENT

‘माझं म्हणणं हेच आहे की, तुम्ही लोकांशी संवाद साधा.. मी आलोय ना.. मला कल्पना आहे की, तुम्ही सगळे चिडलेले आहात तरीही तरी मी तुमच्यासमोर पोलीस बाजूला ठेवून उभा आहे. मला माहिती आहे की, तुम्ही आणि आम्ही कसे बांधले गेलेलो आहोत. कारण माझ्यात प्रामाणिकपणा आहे.’

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> NCP: शरद पवारांच्या ‘हनुमंती’ डावाने अजितदादांचा केला ‘करेक्ट कार्यक्रम?’

‘जे मी पत्र दिलं त्या पत्रात कुठे लिहलं आहे का? लोकांची डोकी फुटली तरी चालतील, गोळ्या घातल्या तरी चालतील, लोकं भिकारी झाली तरी चालतील पण रिफायनरी करा.. असं माझं म्हणणं आहे?’

‘मी असं म्हटलं होतं की, जर रिफायनरी येऊ शकत असेल तर इथल्या लोकांना दाखवा नेमकं काय आहे ते. जर मी नाणारला विरोध केला होता तर असं तिकडे काय वेगळं आहे आणि इकडे काय वेगळं आहे. तिकडे पण माणसं राहतात आणि इकडे पण माणसं राहतात.’

’33 देशांमध्ये गद्दार म्हणून ओळख…’

‘मला तर असं सांगायचं आहे की, आता जे बसलेत गद्दार आपले तिकडे मुख्यमंत्री… 33 देशामध्ये त्यांची ओळख झालीए गद्दार म्हणून.. पण मार्ग कसा काढायचा असतो हे सांगण्यासाठी मी त्यांचा उल्लेख केला नाहीतर त्यांचा उल्लेख करण्याची गरज नाही. आज या गद्दारांना गद्दार म्हणून 33 देशात ओळख झालीए त्या वेळेला 33 सोडा 3 जिल्हे देखील ओळखत नव्हते मंत्री म्हणून.’

‘तो जो एक महामार्ग आहे शिवसेनाप्रमुख समृद्धी महामार्ग.. तिथे सुद्धा एक आंदोलन झालं होतं. मग मला विनंती केली. संभाजीनगर.. जालनाला गेलो… जसं मी आता तुमच्याशी बोलतोय तसं मी तिथे शेतात जाऊन उभा राहिलो. मला तिथल्या शेतकऱ्यांनी दाखवल्या की आमच्या फळबागा आहेत. हे कागदावर ओसाड दाखवलंय म्हणून आमच्या इथून रस्ता जातोय. मग त्यांच्याशी बोललो.. मग ज्या बागा होत्या त्या वाचवल्या.. असं करुन मार्ग काढला.. म्हणजे आपण विकासाच्या आड आलो नाही. तसंच माझं आज सुद्धा म्हणणं आहे.’

हे ही वाचा >> Barsu: ‘लोकांनी झिडकारलेल्या ‘टिल्ल्या-पिल्ल्यां’नी…’, ठाकरेंनी पुन्हा राणेंना डिवचलं

‘आपण अनेक उद्योग महाराष्ट्रात आणत होतो. पण ते सगळे उद्योग कुठे गेले? माझं म्हणणं आहे की, हा प्रकल्प तुम्ही गुजरातला न्या आणि चांगला प्रकल्प इकडे आणा. म्हणजे जे वादग्रस्त प्रकल्प नाहीत ते गुजरातला.. आणि जे वादग्रस्त आहेत ते कोकणाच्या माथी मारतायेत. पण हे नाही चालणार..’

‘पण तुम्ही काळजी करू नका.. लोकांचे मुडदे पाडणार विकास मला मान्य नाही.. असा विकास काही मी होऊ देणार नाही.. त्यामुळे तुम्ही मजबूत राहा.. ज्या काही अटक वैगरे आहे .. ही काही हुकूमशाही नाही.. हुकूमशाही लादण्याचा प्रयत्न केला तर हुकूमशाही तोडून-मोडून टाकेन.. महाराष्ट्र पेटवून यांना आपण हाकलून देऊ.’

‘कारण मतं पाहिजे असेल तर पंतप्रधानांपासून सगळे इकडे येतील. आज मी जन की बात ऐकायला आलोय… मन की बात करायला आलेलो नाही. म्हणून कुठेही मनात शिवसेनेबाबत म्हणजे आपल्या.. चोरांच्या नाही.. आपल्या शिवसेनेवर विश्वास ठेवा..’

‘मी संपूर्ण मीडियासमोर राज्यकर्त्यांना आव्हान देतोय की, आज या सगळ्या तापलेल्या कोकणामध्ये मी जसा त्यांच्यासाठी येऊन उभा राहिलोय.. तसं तुम्हीही येऊन उभे राहा आणि रिफायनरीचं समर्थन करुन दाखवा.’ अशा शब्दात टीका करत उद्धव ठाकरेंनी सरकारचा खरपूस समाचार घेतला.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT