उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे ‘बंड’ सर्वोच्च न्यायालयात! आज सुनावणी
एकनाथ शिंदेंसह जवळपास ३८ ते ४० आमदारांनी बंडखोरी केल्यानं राजकीय वादळ निर्माण झालं आहे. दिवसेंदिवस दोन्ही बाजूंनी आक्रमक भूमिका घेतल्या जात असल्याचं दिसत आहे. शिवसेनेनं १६ आमदारांचं सदस्यत्व रद्द करण्याची मागणी केलीये. यावरूनच आता हे बंड सर्वोच्च न्यायालयात जाऊन पोहोचलं आहे. एकनाथ शिंदेंसह १६ आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून, त्यावर आज सुनावणी होणार […]
ADVERTISEMENT

एकनाथ शिंदेंसह जवळपास ३८ ते ४० आमदारांनी बंडखोरी केल्यानं राजकीय वादळ निर्माण झालं आहे. दिवसेंदिवस दोन्ही बाजूंनी आक्रमक भूमिका घेतल्या जात असल्याचं दिसत आहे. शिवसेनेनं १६ आमदारांचं सदस्यत्व रद्द करण्याची मागणी केलीये. यावरूनच आता हे बंड सर्वोच्च न्यायालयात जाऊन पोहोचलं आहे. एकनाथ शिंदेंसह १६ आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून, त्यावर आज सुनावणी होणार आहे.
एकनाथ शिंदे विरुद्ध शिवसेना वाद सर्वोच्च न्यायालयात गेला आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाने विधानसभा उपाध्यक्षांच्या विरोधातील अविश्वास प्रस्तावासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
त्याचबरोबर विधानसभा उपाध्यक्षांनी सदस्यत्व रद्द करण्याबद्दल जारी करण्यात आलेल्या नोटिशीलाही आव्हान देण्यात आलं आहे.
बंडखोरी केल्यानंतर एकनाथ शिंदे यांना शिवसेनेनं गटनेतेपदावरून हटवलं होतं. त्यांच्या जागेवर शिवडीचे आमदार अजय चौधरी यांची नियुक्ती केली आहे. या नियुक्तीला एकनाथ शिंदेंनी आव्हान दिलं आहे. दोन याचिका दाखल करण्यात आलेल्या असून, सर्वोच्च न्यायालयात काय निवाडा होणार, यावर पुढील राजकारणाची दिशा ठरणार आहे.
