शिंदे गट गुवाहटीला रवाना : अब्दुल सत्तारांसह ४ मंत्री अन् काही आमदारांनी मात्र दौरा टाळला
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बंडात साथ दिलेल्या सर्व सहकाऱ्यांसह पुन्हा एकदा गुवाहटीला गेले आहेत. शनिवारी सकाळी साडे-नऊ वाजता मुंबई विमानतळावरून CM शिंदेंसह त्यांचे समर्थक आजी-माजी आमदार, खासदार आणि त्यांचे कुटुंबिय असे जवळपास १७८ सदस्य एका विमानाने गुवाहटीला रवाना झाले. त्याचवेळी अब्दुल सत्तार यांच्यासह ४ मंत्री अन् काही आमदारांनी मात्र हा दौरा टाळला असल्याची माहिती […]
ADVERTISEMENT

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बंडात साथ दिलेल्या सर्व सहकाऱ्यांसह पुन्हा एकदा गुवाहटीला गेले आहेत. शनिवारी सकाळी साडे-नऊ वाजता मुंबई विमानतळावरून CM शिंदेंसह त्यांचे समर्थक आजी-माजी आमदार, खासदार आणि त्यांचे कुटुंबिय असे जवळपास १७८ सदस्य एका विमानाने गुवाहटीला रवाना झाले. त्याचवेळी अब्दुल सत्तार यांच्यासह ४ मंत्री अन् काही आमदारांनी मात्र हा दौरा टाळला असल्याची माहिती आहे.
शिंदे गटातील गुवाहटी दौऱ्यावर न गेलेले नेते :
मंत्री अब्दुल सत्तार, मंत्री गुलाबराव पाटील, मंत्री तानाजी सावंत, मंत्री शंभूराज देसाई, आमदार चंद्रकांत पाटील, महेश शिंदे, महेंद्र दळवी, खासदार श्रीरंग बारणे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे आमदार आणि मंत्री गुवाहाटी दौऱ्यावर गेलेले नाहीत. याशिवाय आमदार चिमणराव पाटील, किशोर पाटील, लताताई सोनवणे हे देखील दौऱ्यावर गेले नसल्याची माहिती आहे. परंतु त्यांचे फोन बंद असल्याने त्यांच्याबाबत निश्चित माहिती मिळू शकलेली नाही.
याबाबत कोणी नियोजित कार्यक्रम, कोणी घरगुती कार्यक्रम तर काहींनी ग्रामपंचायत निवडणुका असल्याचं सांगितलं आहे. विशेष गोष्ट म्हणजे सर्वांच्या सोयीसाठी यापूर्वी या दौऱ्याची तारीखही बदलण्यात आली होती. आधी हा दौरा २१ नोव्हेंबर रोजी होणार होता. मात्र, ही तारीख बदलून २६ नोव्हेंबर करण्यात आली. त्यानंतरही गेल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
दरम्यान, दौऱ्याबाबत बोलताना अब्दुल सत्तार म्हणाले, नाशिकला कृषी प्रदर्शनाला आलो आहे. १ जानेवारी सिल्लोड फेस्टिवल असल्याने त्याचा अभ्यास करण्यासाठी मी गुवाहाटी जाणार नाही, माझी कोणतीही नाराजी नाही. आमच्यामध्ये कोणताही विसंवाद किंवा मतभेद नाहीत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री चांगलं काम करत आहेत. आम्ही पुढील दिवसांत परत जाऊ. मंदिर, मस्जिद, बुद्ध विहार जाण्यात मला काहीच अडचण नाही. मुख्यमंत्री गेले म्हणजे पूर्ण महाराष्ट्र गेल्यासारखं आहे. भविष्यात पुन्हा गुवाहटीला जाऊ असंही सत्तार यांनी सांगितलं आहे.