Shiv Sena: ठाकरेंना झटका, शिवसेना शिंदेंचीच! निवडणूक आयोगाची सुप्रीम कोर्टात भूमिका
नवी दिल्ली : शिवसेना (Shivsena) आणि शिवसेना पक्ष चिन्ह (Shivsena election symbol एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांना देण्याचा निर्णय रास्त आणि कायद्यानुसार होता, अशी ठाम भूमिका केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका शिवसेना (UBT) च्या वतीने सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) दाखल करण्यात आली आहे. यावर न्यायालयात दाखल केलेल्या उत्तरात […]
ADVERTISEMENT

नवी दिल्ली : शिवसेना (Shivsena) आणि शिवसेना पक्ष चिन्ह (Shivsena election symbol एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांना देण्याचा निर्णय रास्त आणि कायद्यानुसार होता, अशी ठाम भूमिका केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका शिवसेना (UBT) च्या वतीने सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) दाखल करण्यात आली आहे. यावर न्यायालयात दाखल केलेल्या उत्तरात निवडणूक आयोगाने याबाबतची त्यांची भूमिका स्पष्ट केली. (Election Commission in an affidavit filed before the supreme court)
सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात आयोगाने काय म्हटलं?
-
निवडणूक आयोग निष्पक्ष नसल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप निराधार
एकनाथ शिंदे गटाला निवडणूक चिन्ह देण्याचा निर्णय रास्त आणि कायद्यानुसार होता.