मोदी-शाह यांना खुलं आव्हान देणारे हार्दिक पटेल भाजपचे सैनिक कसे झाले?
पाटीदार आंदोलनाचा झेंडा उभारत नरेंद्र मोदी तसंच अमित शाह यांच्याविरोधात बंड पुकारणारे हार्दिक पटेल हे भाजपचे सैनिक झालेत. हार्दिक पटेल यांनी त्यांच्या ट्विटरवरून नरेंद्र मोदी तसंच अमित शाह यांच्या विरोधातले ट्विटही डिलिट केलेत. पाटीदार आंदोलनापासून सुरूवात करत आधी काँग्रेसमधे जाणारे हार्दिक पटेल आता भाजपचे सैनिक झालेत. त्यांचा हा प्रवास कसा झाला आहे हे जाणून घेऊ […]
ADVERTISEMENT

पाटीदार आंदोलनाचा झेंडा उभारत नरेंद्र मोदी तसंच अमित शाह यांच्याविरोधात बंड पुकारणारे हार्दिक पटेल हे भाजपचे सैनिक झालेत. हार्दिक पटेल यांनी त्यांच्या ट्विटरवरून नरेंद्र मोदी तसंच अमित शाह यांच्या विरोधातले ट्विटही डिलिट केलेत. पाटीदार आंदोलनापासून सुरूवात करत आधी काँग्रेसमधे जाणारे हार्दिक पटेल आता भाजपचे सैनिक झालेत. त्यांचा हा प्रवास कसा झाला आहे हे जाणून घेऊ सविस्तर-
गुजरात राज्यात निवडणुका पार पडणार आहेत. त्या निवडणुकीच्या आधीच हार्दिक पटेल यांनी भाजपत प्रवेश केलाय. २०१५ ला गुजरातमधे जे पाटीदार समाजाचं आंदोलन उभं करण्यात हार्दिक पटेल यांचा सिंहाचा वाटा होता. सरकारी नोकरी तसंच शिक्षणात पाटीदार समाजाला आरक्षण मिळावं ही मागणी करत हे आंदोलन पेटलं होतं. हार्दिक पटेल हे या आंदोलनाचा प्रमुख चेहरा होते. एका आंदोलनातील हिंसाचारादरम्यान पोलिसासह १० जणांचा मृत्यू झाला होता. तसंच सार्वजनिक मालमत्तेचंही मोठं नुकसान झालं होतं.
यानंतर हार्दिक पटेल विरोधात आयपीसी १२४ ए, १२१ ए तसंच १२० बी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर २०१६ मध्ये हार्दिक पटेल यांना जामीन मिळाला. राज्यातील भाजपच्या सरकारने आता २०१५ मधले आरक्षण आंदोलनाच्या बाबत दाखल झालेले हार्दिक पटेल यांच्या तसंच इतरांच्या विरोधातले गुन्हे मागे घ्यायला सुरूवात केली आहे.