BJP नेते राजन पाटलांचा जंगलराज की वेगळाच गेम? अनगर राड्याचा Start टू End पिक्चर!
सोलापूर जिल्ह्यातील अनगर नगर पंचायत निवडणूक ही राज्यात चर्चेचा विषय ठरली. याच नगर पंचायत निवडणुकीचे आणि अनगरचा नेमका पिक्चर आता आम्ही आपल्याला दाखवणार आहोत.
ADVERTISEMENT

अनगर (सोलापूर): तब्बल 60 वर्षांपासून सोलापूर जिल्ह्यातील अनगरची निवडणूक बिनविरोध करण्याची परंपरा यंदा बाद होताहोता वाचली. कारण राजन पाटलांना चॅलेंज करत पोलीस प्रोटेक्शनमध्ये फिल्मीस्टाईल भरलेला उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद झाला. राजन पाटलांचं वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झालं आणि सूनबाई नगराध्यक्ष पदावर विराजमान झाल्या. पण अनगरकर पाटलांच्या या वर्चस्वाला हादरा देण्याचं काम केलं दोन पाटलांनीच. एक उमेश पाटील आणि दुसऱ्या उज्ज्वला थिटे पाटील...
एकहाती नगरपंचायत जिंकली आणि राजन पाटलांनी मिशीवर ताव मारला, दंड थोपटले तर बाळराजेंनी तर थेट अजितदादांना नाद न करण्याचं ओपन चॅलेंज दिलं. अर्थात दोघांनीही नंतर माफी मागितली. पण विषय अजून संपलेला नाही.
राजन पाटलांची दहशत, जंगलराज वगैरेच्या चर्चा सध्या मोक्कार होताना दिसताहेत. तसे आरोप उज्ज्वला थिटे आणि उमेश पाटील सतत करत आहेत. म्हणजे अगदी दोघे एकाच पक्षात होते तेव्हापासून.
अनगर निवडणुकीचा इतिहास अन् फ्लॅशबॅक
चला आता जाऊयात फ्लॅशबॅकमध्ये. अनगर हे माजी आमदार राजन पाटील यांचे मूळ गाव. मागील 60 वर्षांपासून ह्या गावाची ग्रामपंचायत बिनविरोध करण्याची परंपरा राहिली आहे. पाटील फॅमिली म्हणजे पवारांची एकदम कट्टर. आता नुकतेच ते भाजपत आलेत.










