बापरे… ड्रग्ज केसमध्ये चक्क ओरीचं नाव, आता थेट मुंबई पोलिसांसमोरच...
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित ड्रग्ज पार्टी प्रकरणी आता प्रसिद्ध सेलिब्रिटी ओरी याचं नाव समोर आलं आहे. ज्यासाठी त्याला पोलिसांकडून समन्सही बजावण्यात आलं आहे.
ADVERTISEMENT

दीपेश त्रिपाठी, मुंबईः अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित ड्रग्ज पार्टी प्रकरणात अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींची नावे समोर येत आहेत. यापूर्वी असे वृत्त होते की , अभिनेत्री नोरा फतेहीला मुंबई पोलिसांनी समन्स बजावले होते. आता याप्रकरणी ओरीचंही नाव समोर आलं आहे.
चित्रपटसृष्टीत ड्रग्ज प्रकरण गाजत आहे. या प्रकरणात अनेक सेलिब्रिटींचा सहभाग असल्याचा आरोप आहे. अलिकडेच, मुंबई पोलिसांच्या अँटी नार्कोटिक्स सेलने एका मोठ्या ड्रग्ज सिंडिकेटचा पर्दाफाश केला होता. हे सिंडिकेट अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा दुबईस्थित भागीदार सलीम डोला चालवत होता.
मुंबई पोलिसांनी ओरीला धाडलं समन्स
ओरीचा या ड्रग्ज प्रकरणात सहभागी असल्याचे वृत्त समोर आलं आहे. ओरी हा सोशल मीडिया इन्फ्ल्युएन्सर आहे. मुंबई पोलिसांनी त्याला 252 कोटी रुपयांच्या ड्रग्ज प्रकरणात समन्स बजावले आहे. ओरीला गुरुवारी, 20 नोव्हेंबर रोजी ड्रग्ज प्रकरणासंदर्भात हजर व्हावं लागणार आहे. ओरीला घाटकोपर युनिटमध्ये त्याचे म्हणणे मांडण्यासाठी हजर राहावे लागेल.
हे ही वाचा>> सासऱ्याचे सुनेसोबत अनैतिक संबंध! नवऱ्याने दोघांना 'त्या' अवस्थेत पाहिलं अन् घडली भयानक घटना...
ओरीच्या आधी, नोरा फतेहीचे नावही या प्रकरणात समोर आले आहे. सोशल मीडिया पोस्टद्वारे या प्रकरणावरील तिचे मौन तोडत नोराने लिहिले, "मी पार्ट्यांमध्ये जात नाही. मी सतत काम करत असते. मी कामाची आवड असलेली आहे. माझे वैयक्तिक आयुष्य नाही. मी स्वतःला अशा लोकांशी जोडत नाही. जेव्हा मी सुट्टीवर असते तेव्हा मी दुबईतील माझ्या घरी आणि समुद्रकिनाऱ्यावर मित्रांसोबत वेळ घालवणे पसंत करते."










