Urfi: रस्त्यावर नागडी नाचणारी अभिनेत्री मी पाहिलेली नाही: चित्रा वाघ

Chitra Wagh Criticized Urfi Javed: भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी पुन्हा एकदा अभिनेत्री उर्फी जावेदवर निशाणा साधला आहे. पाहा औरंगाबादमध्ये पत्रकारांशी बोलताना चित्रा वाघ नेमकं काय म्हणाल्या.
चित्रा वाघ पुन्हा एकदा उर्फी जावेदवर संतापल्या
चित्रा वाघ पुन्हा एकदा उर्फी जावेदवर संतापल्या

इसरार चिश्ती, औरंगाबाद

BJP leader Chitra Wagh has once again targeted actress Urfi Javed: औरंगाबाद: भाजप (BJP) नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) आणि अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) यांच्यातील तू-तू-मै-मै काही केल्या कमी होत नाहीए. या दोघींपैकी एकही मागे हटण्यास तयार नाही. याचा पुन्हा प्रत्यय आज (15 जानेवारी) औरंगाबादमध्ये आला. औरंगाबादमध्ये पत्रकारांशी बोलताना चित्रा वाघ यांनी पुन्हा एकदा उर्फी जावेदवर निशाणा साधला आहे. (i never seen another actress who dances naked on the street chitra wagh again angry at urfi javed)

'रस्त्यावर नागडं नाचणं आजपर्यंत कुठल्या अभिनेत्रीला आम्ही पाहिलेलं नाहीए. मी इशारा दिला आहे अजून पण सांगते. नागडी-उघडी फिरू नको. आमचं तेवढंच एक म्हणणं आहे.' असं म्हणत चित्रा वाघ यांनी उर्फी जावेदबाबत पुन्हा एकदा कठोर भूमिका स्वीकारली आहे. पाहा चित्रा वाघ नेमकं काय म्हणाल्या:

चित्रा वाघ पुन्हा एकदा उर्फी जावेदवर संतापल्या
Urfi Javed: 'एवढंच बोलते की, माझा नंगानाच चालूच राहील...', उर्फी बरळली

'पुन्हा सांगते उघडी-नागडी फिरू नको'

'जीवे मारण्याची धमकी आणि मी.. मी धमक्या वैगरे देत नाही.. मी इशारा दिला आहे अजून पण सांगते. नागडी-उघडी फिरू नको. आमचं तेवढंच एक म्हणणं आहे. दुसरं काही एक म्हणणं नाहीए. त्यामुळे धमकी काय प्रकार असतो हे मला माहित नाही. मी तर इशारा दिलाए आणि तो मी थेट दिला आहे. मला काही धमकी देण्याची गरज वाटत नाही.' असं चित्रा वाघ यावेळी म्हणाल्या.

'रस्त्यावर नागडं नाचणारी दुसरी अभिनेत्री पाहिलेली नाही'

'रस्त्यावर नागडं नाचणं आजपर्यंत कुठल्या अभिनेत्रीला आम्ही पाहिलेलं नाहीए. बॉलिवूडमध्ये काम करते तुमच्या रोलप्रमाणे तुमची काय गरज असेल ती तुम्ही स्क्रिनवर दाखवा. रस्त्यावर नाही. आमचा आक्षेप हा रस्त्यावर उघडं-नागडं नाचायला आहे.' 'तेवढं जर समजायची कुवत असेल तर कृपया समजून घ्या किंवा तिला जे समजवणारे आहेत त्यांनी तरी समजवायला पाहिजे.' असं म्हणत चित्रा वाघ यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.
चित्रा वाघ पुन्हा एकदा उर्फी जावेदवर संतापल्या
Urfi Javed: चित्रा वाघांची कोंडी करणारी उर्फी जावेद आहे तरी कोण?

'...तर लोकं दगडाने मारतील ना'

'ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. तुमच्या संभाजीनगरच्या चौकामध्ये उघडी नाचलेली तुम्हाला सगळ्यांना चालेल का? कपडे घाला एवढंच म्हणतोय आम्ही. ती काय व्यक्ती स्वातंत्र्य आहे? तू काय घालायचं, काय नाही घालायचं याचं तुला स्वातंत्र्य आहे. उद्या तू आपली अंडरपँट घालून फिरशील तर लोकं दगडाने मारतील ना तुला. हेच सांगतेय मी तुला.. कपडे काय घालायचे आणि काय घालू नये हे ठरविण्याआधी कपडे घालायला शिका. त्यानंतर बोला.' असं म्हणत चित्रा वाघ यांनी पुन्हा एकदा उर्फीबाबत भाष्य केलं आहे.

उर्फी पोलिसांसमोर हजर

चित्रा वाघ यांनी काही दिवसांपूर्वीच उर्फीच्या कपड्यांवर आक्षेप घेत मुंबई पोलिसात तक्रार दाखल केलेली होती. त्यानंतरही अनेक दिवस उर्फीवर पोलिसांकडून कोणतीही कारवाई करण्यात आली नव्हती. अखेर दोन दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांकडून उर्फीला चौकशीसाठी हजर राहण्यातबाबत नोटीस पाठवण्यात आली होती. त्यानुसार उर्फी अंबोली पोलिसांसमोर हजर झाली आणि तिने तिथे आपली बाजी मांडली.

यावेळी उर्फी म्हणाली, 'मी स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे. मला शूट करणं आणि वेगवेगळे कपडे घालणं आवडतं. त्यामुळे हा काही संविधानात गुन्हा नाही. मी जेव्हा शूटसाठी बाहेर पडते तेव्हा माध्यमांचे प्रतिनिधी मला शोधतात आणि माझे फोटो काढतात. हे फोटो काही मी व्हायरल करत नाही.' असा जबाब उर्फीने दिला आहे.

Related Stories

No stories found.
logo
Mumbai Tak
www.mumbaitak.in