Sharad Pawar: ’48 तासात हे थांबलं नाही तर, मी स्वत:..’, शरद पवार उतरले रणांगणात

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Sharad Pawar on Belgaum: मुंबई: महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद हा पुन्हा एकदा उफाळून आला आहे. या वादाने सध्या सीमाभागातील परिस्थिती तणावाची बनली आहे. त्यातच महाराष्ट्रातून (Maharashtra) बेळगावात (Beolgaum) जाणाऱ्या वाहनांची कन्नडिगांकडून तोडफोड करण्यात येत आहे. या सगळ्या प्रकाराबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी मात्र संताप व्यक्त केला आहे. जर येत्या 48 तासात हा सगळा प्रकार थांबला नाही तर आपण स्वत: बेळगावमध्ये जाऊन तेथील मराठी भाषिकांना धीर देऊ असं शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं आहे. (if this doesnt stop in 48 hours i myself will go to belgaum sharad pawar entry in maharashtra karnataka border dispute case)

पाहा शरद पवार नेमकं काय म्हणाले:

‘सीमावादाची सुरुवात ही कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांनी केली. पहिलं, दुसरं, तिसरं स्टेटमेंट हे कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांचं होतं. त्यांच्या वक्तव्याला काही ना काही प्रतिक्रिया राजकीय नेत्यांनी दिल्या असतील तर तो त्यांचा दोष नाही. पण याची सुरुवात ही कर्नाटकातून झाली आहे. आतापर्यंत फक्त बेळगावची चर्चा होती. पण आता जाणीवपूर्वक दोन-चार ठिकाणची चर्चा सुरु झाली आहे. या सगळ्या प्रकरणाला वेगळं स्वरुप देण्याचा प्रयत्न आहे. ही गोष्ट आमच्या लक्षात आली आहे.’

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

‘महाराष्ट्र एकीकरण समितीच्या लोकांचे मला फोन आले. पण राज्य सरकारने आधी काही जाहीर केलं नंतर काही बदल केले. ठीक आहे… पण या सगळ्या गोष्टीत केवळ राज्य सरकार काय करतंय. हे बघून चालणार नाही. आता जे झालं आज.. हे जर येत्या 24 तासात किंवा 48 तासात पूर्णपणे थांबलं नाही तर माझ्यासह सगळ्यांना बेळगावच्या लोकांना धीर द्यायला जावं लागेल.’

सोलापूरमध्ये कर्नाटक भवन! CM बोम्मई घोषणा करुन थांबले नाहीत… नियोजनालाही लागले

ADVERTISEMENT

‘अजूनही असे प्रकार घडू नये अशी इच्छा आहे. मी एवढंच सांगितलं की, एवढा संयम दाखवून सुद्धा कर्नाटकाच्या सीमेवर हे जर घडत असेल तर लोकांचा उद्रेक कुठेही जाऊ शकतो. तो जाऊ नये. हाच आमचा प्रयत्न राहील.’ असं शरद पवार यावेळी म्हणाले.

ADVERTISEMENT

सीमावाद: ’24 तासात वाहनांवरील हल्ले थांबले नाही तर…’, शरद पवार संतापले

सीमावाद अधिक चिघळणार?

येत्या वर्षभरात कर्नाटकमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. याच निवडणुकीच्या दृष्टीने कर्नाटकमधील भाजप सीमावादाचा प्रश्न धगधगत ठेवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप आता विरोधक करु लागले आहेत. त्यातच स्वत: कर्नाटकचे मुख्यमंत्री चिथावणीखोर वक्तव्य करुन सीमा भागातील नागरिकांना उकसवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे येथील वातावरण अधिकच चिघळण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अशावेळी केंद्र सरकार कर्नाटक सरकारला समज देणार की पाठिशी घालणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT