विनायक मेटेंच्या मृत्यूची एसआयटीकडून चौकशीची करा; राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांची मागणी

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या अपघाती निधनानंतर, त्यांचा घात की अपघात? असा संशय कार्यकर्त्यांसह त्यांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केलाय. त्यामुळे राज्याच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी, या प्रकरणाची एसआयटीमार्फत सखोल चौकशी करावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांनी केली आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका पदाधिकाऱ्याने मेटेंच्या कुटुंबियांबद्दल आक्षेपार्ह कमेंट केल्याने त्याचे पदं स्थगित करण्यात आले आहे. तसं पत्रक महेबूब शेख यांनी काढलं आहे.

एसआयटीकडून चौकशीची मागणी

विनायक मेटे यांचं 14 ऑगस्ट रोजी मुंबई- पुणे महामार्गावर अपघातात निधन झालं होतं. त्यानंतर त्यांच्या मृत्यूबाबत विविध शंका उपस्थित केले जात आहे. स्वतः त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त केले आहे. त्यावरून आता राष्ट्रवादीचे युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांनी या संपूर्ण प्रकरणाची एसआयटीकडून चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

महेबूब शेख यांनी उपस्थित केले काही प्रश्न

बीड जिल्ह्याच्या बाबतीत ही दुसरी घटना आहे. यापूर्वी गोपीनाथ मुंडे आणि आता विनायक मेटे यांचं सकाळच्या अपघातात मृत्यू झालाय. पण यात काही शंका आहे. माणूस जीवाशी जातो पण ड्रायव्हरला काही होत नाही, असं महेबूब शेख म्हणाले. सुरुवातीला तासभर मदत मिळाली नाही, असं म्हणलं जातं. पण मुंबई- पुणेसारख्या महामार्गावर मदत का मिळाली गेली नाही, या सर्व प्रकारची गांभीर्याने दखल घेतली गेली पाहिजे. त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी तात्काळ एसआयटी स्थापन करून चौकशी करत बीड जिल्हावासियांची शंका दूर करावी, अशी मागणी मेहबूब शेख यांनी केली आहे.

ADVERTISEMENT

आक्षेपार्ह कमेंट केल्याने राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याला पदावरून काढले

ADVERTISEMENT

विनायकराव मेटे यांच्या आईने एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीच्या व्हिडिओवर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव गजानन खमीतकर यांनी आक्षेपार्ह कमेंट केली होती. याची मेहबूब शेख यांनी दखल घेतली असून खमतीकर यांना पदावरून काढून टाकलं आहे. तसेच त्यांच्याकडून खुलासा मागवण्यात आल्याचं मेहबूब शेख यांनी सांगितलं. आपलं अकाउंट हॅक झाल्याचं खमीतकर यांनी सांगितल्याचं शेख म्हणाले. त्यामुळे याबाबत पोलिसात तक्रार करा, जर यात काही खोटं आढळ्यास पक्षातून हकालपट्टी करण्यात येईल, असं आपण या पदाधिकाऱ्याला सांगितल्याचं शेख म्हणाले.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT