‘जलयुक्त शिवार’ योजना पुन्हा सुरु होणार; या कारणामुळं ठाकरे सरकारनं बंद केली होती योजना

मुंबई तक

देवेंद्र फडणवीस जलयुक्त शिवार आहे ड्रीम योजना युतीचं 2014 साली सरकार असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलयुक्त शिवार योजना सुरु केली होती. फडणवीसांची ही ड्रीम योजना होती. मात्र महाविकास आघाडी सरकारने कोट्यवधींचा घोटाळा झाल्याचं सांगत योजना बंद करून टाकली होती. आता शिंदे-फडणवीस सरकार आल्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मोठी घोषणा केलीय. देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळातील ‘जलयुक्त […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

देवेंद्र फडणवीस जलयुक्त शिवार आहे ड्रीम योजना

युतीचं 2014 साली सरकार असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलयुक्त शिवार योजना सुरु केली होती. फडणवीसांची ही ड्रीम योजना होती. मात्र महाविकास आघाडी सरकारने कोट्यवधींचा घोटाळा झाल्याचं सांगत योजना बंद करून टाकली होती. आता शिंदे-फडणवीस सरकार आल्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मोठी घोषणा केलीय.

देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळातील ‘जलयुक्त शिवार’ योजनेचे झालेले फायदे, भाजपकडून सांगण्यात आले आहेत. या योजनेमुळं मराठवाड्यात भूजल पातळी सरासरी ३ मीटर ने वाढली, असा भूजल तज्ञांचा रिपोर्ट असल्याचा दावा करण्यात आलाय. या योजनेमुळं शेतकरी दुहेरी पिके घेऊ लागला. शेतकऱ्यांच उत्त्पन्न वाढलं. जनावरांना १२ महिने चारा मिळू लागला, असे फायदे भाजपकडून सांगण्यात आले आहेत.

मनात आकस धरून महत्वाकांक्षी योजना बंद केली : भाजप

हे वाचलं का?

    follow whatsapp