Kirit Somaiya: 'जो बायकोचा नाही होऊ शकला तो महाराष्ट्राचा काय होणार?', सोमय्यांची बोचरी टीका

'रश्मी ठाकरे २ आहेत.. की उद्धव ठाकरेंना २ बायका आहेत?, जो बायकोचा नाही होऊ शकला तो महाराष्ट्राचा काय होणार?' अशी बोचरी टीका किरीट सोमय्या यांनी केली आहे.
kirit somaiya criticized to uddhav thackeray over 19 bunglow and rashmi thackeray letter
kirit somaiya criticized to uddhav thackeray over 19 bunglow and rashmi thackeray letter

मिथिलेश गुप्ता, कल्याण: 'जो बायकोचा होऊ शकला नाही तो महाराष्ट्राचा काय होणार?', अशी जहरी टीका करत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर बोचरी टीका केली आहे. कल्याणमध्ये झालेल्या भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्यात किरीट सोमय्या बोलत होते. त्यावेळी त्यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी 19 बंगल्याच्या प्रकरणात 2019 आणि 2021 साली ग्रामपंचायतींना दोन पत्रं लिहिली. यातल्या पहिल्या पत्रात 19 बंगले आमच्या नावावर करा, अशी मागणी करण्यात आली होती. तर दुसऱ्या पत्रात तिथे बंगले नव्हते, असं रश्मी ठाकरे यांनी म्हटलं आहे. असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला.

ही दोन्ही पत्रं दाखवत यावर उद्धव ठाकरे कालच्या सभेत का बोलले नाहीत? असा सवाल किरीट सोमय्या यांनी केला. तसंच ही दोन पत्रं लिहिणाऱ्या दोन रश्मी ठाकरे आहेत का? की उद्धव ठाकरेंच्या दोन बायका आहेत का? की, एकाच रश्मी ठाकरेंनी दोन्ही पत्रं लिहिली आहेत? की उद्धव ठाकरेंनी ही पत्रं लिहिली आहेत? असे अनेक सवाल किरीट सोमय्या यांनी यावेळी विचारले आहेत.

याचवेळी बोलताना सोमय्या असंही म्हणाले की, 'जो बायकोचा होऊ शकत नाही तो महाराष्ट्राचा काय होणार?' अशी बोचरी टीका त्यांनी केली.

'तर शिवसेना प्रवक्ते संजय राऊत हे शिवसेनेचा आणि उद्धव ठाकरेंचा भोंगा असून ते ज्या शिव्या देतात त्या उद्धव ठाकरेंच्या डोक्यातून येतात. आमची लायकी काढता, आधी तुमची लायकी काय आहे?' असा सवालही सोमय्या यांनी विचारला आहे.

भाषणाच्या सुरुवातीलाच उद्धव ठाकरे यांनी काल जे भाषण केलं त्याचा करारा जवाब मिलेगा, असं म्हणत एक महिन्यात उद्धव ठाकरेंच्या सरकारचा हिशोब किरीट सोमय्या देणार असं आव्हान त्यांनी दिलं.

प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारांवरच का भडकले किरीट सोमय्या?

दरम्यान, कालच्या सभेपूर्वी मराठी वृत्तवाहिन्यांवर सुरू असलेल्या वार्तांकनावर टीका करत मराठी चॅनेल्सवर पेड अॅडव्हर्टाइझमेंट असते असं म्हणत ही काय बातमी आहे का? असं किरीट सोमय्या म्हणाले.

kirit somaiya criticized to uddhav thackeray over 19 bunglow and rashmi thackeray letter
आयएनस विक्रांतमध्ये एक दमडीचा गैरव्यवहार नाही, उद्धव ठाकरेंचं सरकार उद्धट-सोमय्या

तर पत्रकारांना बाईट देताना पुन्हा एकदा सोमय्या भडकले. पत्रकारांच्या प्रश्नांवर वैतागून ते असं म्हणाले की, 'मुख्यमंत्र्यांनी अडीच वर्षात काय केलं हे त्यांना विचारलं का? हे विचारण्याची कुठल्याही चॅनेल आणि पत्रकारामध्ये हिंमत नाही.' असं ते म्हणाले.

त्यानंतर टीआरपी वाढवण्यासाठी चॅनेलवाल्यांनी मस्ती करायची नाही, असं म्हणत किरीट सोमय्या हे पुन्हा एकदा पत्रकारांच्या प्रश्नांवर वैतागलेले दिसले.

दरम्यान, याआधीही किरीट सोमय्या यांना जेव्हा-जेव्हा त्यांच्या विरोधात सवाल विचारण्यात आले तेव्हा-तेव्हा ते पत्रकारांवरच उखडलेले दिसून आले आहेत. त्यामुळे आता असाही सवाल विचारला जात आहे की, सोमय्या कौ घुस्सा क्यूँ आता है?

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in