Mohammad Faizal : NCPला महाराष्ट्राबाहेर मोठा झटका! फैजलांची खासदारकी गेली
लक्षद्वीप : राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकसभेतील ५ खासदारांची संख्या आता एकने कमी झाली आहे. लक्षद्वीपचे खासदार पी.पी. मोहम्मद फैजल यांना लोकसभेतून बडतर्फ करण्यात आलं आहे. फैजल यांना २००९ मधील एका खुनी हल्ला प्रकरणात न्यायालयाने नुकतीच तब्बल १० वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. या निकालानंतर त्यांच्या खासदारकीवर गंडातर आलं आहे. २०१३ मधील सर्वोच्च न्यायालयाच्या एका निकालानुसार एखाद्या प्रकरणात […]
ADVERTISEMENT

लक्षद्वीप : राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकसभेतील ५ खासदारांची संख्या आता एकने कमी झाली आहे. लक्षद्वीपचे खासदार पी.पी. मोहम्मद फैजल यांना लोकसभेतून बडतर्फ करण्यात आलं आहे. फैजल यांना २००९ मधील एका खुनी हल्ला प्रकरणात न्यायालयाने नुकतीच तब्बल १० वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. या निकालानंतर त्यांच्या खासदारकीवर गंडातर आलं आहे.
२०१३ मधील सर्वोच्च न्यायालयाच्या एका निकालानुसार एखाद्या प्रकरणात लोकप्रतिनिधीला २ वर्षांपेक्षा जास्त शिक्षा झाली तर त्यांचं पद रद्द होते. त्यानुसार लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी ही कारवाई केली आहे.
लक्षद्वीपमधील कवरत्ती जिल्हा आणि सत्र न्यायालयाने नुकतचं खासदार पी. पी. मोहम्मद फैजल यांच्यासह चार जणांना खुनी हल्ला केल्याच्या आरोपात दोषी ठरवलं होतं. याच प्रकरणात आता न्यायालयाने त्यांना १० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. या गुन्ह्यात दोषींना प्रत्येकी एक लाख रुपयांचा दंडही ठोठावला असल्याची माहिती या प्रकरणाशी संबंधित वकिलांनी दिली आहे.