मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा मोर्चाची हाक; सोमवारी कळंबमधून निघणार महामोर्चा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

शिक्षण आणि नोकरीत ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावे, यासाठी उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यात 19 सप्टेंबर रोजी महामोर्च्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्च्याला आजूबाजूच्या परिसरातील तालुक्यासह 100 गावाहून 1 लाख हुन जास्त मराठा समाजातील बांधव एकत्र येतील, असा अंदाज आयोजकांकडून वर्तवला जात आहे. मराठा ठोक मोर्चानंतर राज्यातून निघणारा हा पहिलाच मोर्चा आहे. त्यामुळे याची जोरदार तयारी सुरु आहे. 50 टक्क्यांच्या आतील ओबीसी कोट्यातुनच आरक्षण घ्यावं, असं देखील या मोर्च्याच्या मागणीत अधोरेखित करण्यात आलं आहे.

महिलांचा मोठ्याप्रमाणात समावेश

गेल्या महिन्याभरापासून महामोर्च्याच्या आयोजनाची तयारी जोरात सुरु आहे. यात महिलांचा समावेश मोठ्याप्रमाणात आहे. महिलांची एक टीम गावोगावी फिरून बैठका घेत आहे. बैठकांमध्ये आपल्या कुटुंबांसह मोर्च्याला उपस्थित राहण्याचे आवाहन या महिला ब्रिगेड करत आहे. गेल्या महिनाभरापासून या बैठकांचा जोर आहे. त्यामुळे 19 तारखेला होणाऱ्या मोर्चात महिलांची संख्या मोठी असणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

मोर्च्याच्या आधी कळंब शहरात मराठा समाजाची मोठी रॅली

आरक्षण आपल्या हक्काचं म्हणत मराठा समाजातील विविध वयोगटातील मंडळी कामाला लागली आहे. शनिवारी कळंब शहरात मोर्चाबाबत जनजागृती रॅली काढण्यात आली होती. यामध्ये हजारो तरुण, महिला, पुरुष, विद्यार्थी सहभागी झाले होते. यासह मराठा समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी देखील बहुसंख्येत उपस्थित होती. राष्ट्रगीताने रॅलीची सांगता करण्यात आली. तर ग्रामीण भागातील तरुणांनी गावोगावी मोटारसायकल रॅली काढून मोर्च्याला मोठ्यासंख्येत उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

दुकानं बंद ठेऊन व्यापाऱ्यांनी दर्शविला पाठिंबा

19 सप्टेंबरला शहरातील विद्याभवन शाळेपासून हा मोर्चा निघणार आहे, जो नंतर उपविभागीय कार्यालयावर जाऊन धडकणार आहे. ज्यामध्ये सुरुवातीला विद्यार्थिनी आणि महिला असतील. तसंच मोर्च्याच्या दिवशी व्यापारी महासंघाने पाठिंबा दर्शवत दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मोर्चासाठी आवश्यक ती तयारी मराठा समाजाच्यावतीने करण्यात आली आहे. स्वागत कमानी, भगवे झेंडे आणि पार्किंगची सोय देखील करण्यात आली आहे.

7 मुलींचे भाषण होणार

एकूणच जर या महामोर्च्याच्या रुपरेषेकडे लक्ष दिल्यास यात महिलांची महत्वाची भूमिका असल्याचं दिसून येत आहे. विद्याभवन शाळेपासून उपविभागीय कार्यालयावर मोर्चा पोचल्यास पाच मुली जाऊन निवेदन देणार आहेत. तर नंतर सर्व मंडळी एका मैदानावर येऊन जमतील. जिथे व्यासपीठावर फक्त 7 मुलींचे भाषण होणार आहे. मोर्चामध्ये पहिलं मुली नंतर महिला आणि मग पुरुष असं क्रम असणार आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT