शेतकऱ्यांचा लॉंग मार्च ठाण्यात येताच CM शिंदे अ‍ॅक्शनमध्ये; मोठे निर्णय होणार?

मुंबई तक

Farmers long march : ठाणे : नाशिकहून निघालेला लॉंग मार्च मुंबईच्या उंबरठ्यावर येताच राज्य सरकाराने तातडीने पावलं उचलतं शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या आहेत. आज (गुरुवारी) दुपारी विधानभवनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि शेतकरी संघटना यांच्यात बैठक पार पडली. यानंतर सरकार शेतकऱ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक असल्याचं मुख्ममंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. तर २० तारखेपर्यंत शेतकरी सरकारच्या […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

Farmers long march :

ठाणे : नाशिकहून निघालेला लॉंग मार्च मुंबईच्या उंबरठ्यावर येताच राज्य सरकाराने तातडीने पावलं उचलतं शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या आहेत. आज (गुरुवारी) दुपारी विधानभवनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि शेतकरी संघटना यांच्यात बैठक पार पडली. यानंतर सरकार शेतकऱ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक असल्याचं मुख्ममंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. तर २० तारखेपर्यंत शेतकरी सरकारच्या आदेशाची वाट पाहतील, पण मागण्यांची अंमलबजावणी न झाल्यास लॉंग मार्च पुन्हा मुंबईकडे येईल असा इशारही शेतकरी नेत्यांनी दिला आहे. (Maharashtra government takes immediate steps and has accepted the demands of the farmers.)

CM एकनाथ शिंदे काय म्हणाले?

याबाबत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, शेतकऱ्यांच्या लाँग मार्चबाबत सरकारशी सकारात्मक चर्चा झाली. यासंदर्भात उद्या सभागृहात निवेदन दिले जाणार आहे. शेतकऱ्यांच्या बहुतांश मागण्या सरकारने मान्य केल्या असून, मागण्यांवर बैठकीत सविस्तर आणि सकारात्मक चर्चा झाली. शासनाने शेतकऱ्यांना लाँग मार्च मागे घेण्याचे आवाहन केले आहे.

शेतकरी नेते काय म्हणाले?

या शिष्टमंडळातील सदस्य आणि माजी आमदार जीवा पांडू गावित यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं, जोपर्यंत सरकार याबाबत जीआर (शासकीय आदेश) जारी करत नाही आणि त्याची अंमलबजावणी करत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही. 20 तारखेपर्यंत मागण्या मान्य न केल्यास लाँग मार्च मुंबईच्या दिशेने येणार असल्याचा इशारा शेतकरी संघटनेने सरकारला दिला आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp