भगतसिंह कोश्यारीचं वादग्रस्त वक्तव्य "छत्रपती शिवराय जुन्या काळातले आदर्श नितीन गडकरी आत्ताचे"

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वक्तव्यामुळे नवा वाद होण्याची चिन्हं
Maharashtra Governor Bhagat sing koshyari Controversial statement About Chahatrapati Shivaji Maharaj
Maharashtra Governor Bhagat sing koshyari Controversial statement About Chahatrapati Shivaji Maharaj

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि वाद यांचं नातं जुनं आहे. आपल्या वक्तव्यांमुळे ते सतत वादात अडकतात. त्यानंतर त्यांना सारवासारव करावी लागते. आज पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यामुळे नवा वाद पेटण्याची चिन्हं आहेत.

Maharashtra Governor Bhagat sing koshyari Controversial statement About Chahatrapati Shivaji Maharaj
समर्थ नसते तर शिवाजी महाराजांचे स्थान काय असते?: राज्यपाल कोश्यारी

काय म्हटलं आहे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी?

"आम्ही जेव्हा शाळेत शिकत होतो. तेव्हा आमचे शिक्षक आम्हाला विचारत असत की तुमचा आवडता नेता कोण? कुणी सुभाषचंद्र बोस, कुणी महात्मा गांधी, कुणी पंडित नेहरूंचं नाव घ्यायचं. मला वाटतं आता हा प्रश्न आला की तुमचा आयकॉन कोण? तुमचा आवडता नेता कोण? तर तुम्हाला बाहेर जायची आवश्यकता नाही. महाराष्ट्रातच तुम्हाला तुमचे आयकॉन मिळतील. छत्रपती शिवाजी महाराज तर जुन्या युगातले आहेत. मी आत्ताच्या काळाबाबत बोलतो आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपासून ते नितीन गडकरींपर्यंत अनेक आयकॉन आहेत"

काय कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पदवीदान समारंभ सुरू होता. त्यावेळी भगतसिंह कोश्यारींच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि भाजपचे नेते नितीन गडकरी डीलिट ही पदवी देऊन गौरवण्यात आलं. या कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी हे वक्तव्य केलं आहे.

Maharashtra Governor Bhagat sing koshyari Controversial statement About Chahatrapati Shivaji Maharaj
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी कोण कोणत्या वादांमुळे चर्चेत राहिले?

अनिल देसाई यांनी काय म्हटलं आहे?

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना अशीच वक्तव्यं करायची सवयच आहे. नितीन गडकरी काय आहेत किंवा शरद पवार काय आहेत? ते त्यांना आज समजलं असेल असं म्हणत अनिल देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

संभाजी ब्रिगेडची राज्यपालांवर टीका

संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी संतोष शिंदे यांनी राज्यपालांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना कोश्यारी महाराष्ट्र आणि शिवद्रोही असल्याचं म्हटलंय.राज्यपाल महोदय छत्रपती शिवाजी महाराज साडेतीनशे वर्षानंतर देखील महाराष्ट्राच्या आणि देशाच्या प्रत्येक माणसाच्या नसानसात भिनलेले आहेत. आज छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श उभ्या महाराष्ट्राच्या डोळ्यासमोर आहे. तुम्ही एकदा गडकिल्ले फिरा म्हणजे तुम्हाला कळेल. उगाच उठायचं अणि जीभ टाळला लावायची हे धंदे बंद करा, असं संतोष शिंदे म्हणालेत.

राज्यपालांनी याआधीही एकदा छत्रपती शिवरायांबाबत केलं होतं वादग्रस्त वक्तव्य

गुरुची महती पटवून देण्याच्या नादात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाबाबत वादग्रस्त विधान केलं होतं. चाणक्याशिवाय चंद्रगुप्ताला कोण विचारेल आणि समर्थ रामदारांशिवाय छत्रपती शिवाजी महाराजांचा कोण विचारेल, असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता? राज्यपाल भगत सिंह कोश्यारींच्या या वक्तव्यावरूनही चांगलाच वाद निर्माण झाला होता.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in