थेट सरपंचपदासाठीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर! 1,166 ग्रामपंचायतीसाठी 13 ऑक्टोबरला मतदान

मुंबई तक

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी निवडणूक कार्यक्रम निवडणूक आयोगाने आज जाहीर केला. राज्यातील १८ जिल्ह्यांतील ८२ तालुक्यांमधील १ हजार १६६ ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या निवडणुकांसाठी १३ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. १४ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होऊन निकाल घोषित केले जाणार आहेत. राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी निवडणूक कार्यक्रम निवडणूक आयोगाने आज जाहीर केला. राज्यातील १८ जिल्ह्यांतील ८२ तालुक्यांमधील १ हजार १६६ ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या निवडणुकांसाठी १३ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे.

संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. १४ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होऊन निकाल घोषित केले जाणार आहेत. राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज राज्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. यावेळी निवडणूक आयुक्त मदान म्हणाले, ‘संबंधित तहसीलदार 13 सप्टेंबर रोजी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करतील.’

ग्रामपंचायत निवडणूक २०२२ : असा आहे निवडणूक कार्यक्रम

उमेदवारी अर्ज २१ ते २७ सप्टेंबर या कालावधीत दाखल करण्यात येणार आहे. शनिवार व रविवारच्या सुट्टीमुळे २४ व २५ सप्टेंबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करता येणार नाहीत. उमेदवारी अर्जांची छाननी २८ सप्टेंबर केली जाणार आहे.

उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत ३० सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत असणार आहे. त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचं वाटप होणार असून, मतदान १३ ऑक्टोबर रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत होणार आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp