महाराष्ट्राचे उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत एकनाथ शिंदे गटात दाखल

महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात उद्धव ठाकरेंकडे आता फक्त आदित्य ठाकरे हे एकच मंत्री
Maharashtra Higher Education Minister Uday Samant Eknath Shinde has joined the group
Maharashtra Higher Education Minister Uday Samant Eknath Shinde has joined the group

महाराष्ट्राचे उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत एकनाथ शिंदे गटात दाखल झाले आहेत. त्यांचा रॅडीसन हॉटेलमधला फोटोही समोर आला आहे. उदय सामंत हे या एकनाथ शिंदे गटात जातील याची चर्चा सुरू झाली होती. त्यानंतर ते चार्टर्ड फ्लाईटने गुवाहाटीला गेल्याची माहिती समोर आली. आता त्यांचा तिथला फोटोही समोर आला आहे.

उदय सामंत हे ठाकरे सरकारमधले आठवे मंत्री आहेत जे शिंदे यांच्या गटात सहभागी झाले आहेत. त्यामुळे आता ठाकरे सरकारमधे आदित्य ठाकरे हे एकच मंत्री राहिले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या बंडाला सहा दिवस पूर्ण झाले आहेत. अशात शिंदे गटाचं प्राबल्य वाढताना दिसतं आहे.

उदय सामंत हे कोकणातले सेनेचे प्रमुख नेते मानले जातात, ते गुवाहाटीला गेले आहेत त्यामुळे एकच खळबळ माजली आहे. ज्या चार्टड विमानाने ते गेले आहेत, त्या विमानाच्या यादीत उदय सामंत हे नाव पहिलं आहे. चार्टड विमानाच्या या लिस्टमध्ये हे नाव पहिलं आहे.

एकीकडे उद्धव ठाकरे हे भावनिक आवाहन करत आहेत. आदित्य ठाकरेंनीही काल आणि त्याआधीही पक्षातल्या पदाधिकाऱ्यांची भेट आणि मेळावे घेतले आहेत. एकीकडे काही शिवसैनिक रस्त्यावर उतरले आहेत तर दुसरीकडे एवढ्या मोठ्या घडामोडी घडत असताना उदय सामंत यांनी गुवाहाटीला जाणं पसंत केलं आहे. शिवसेनेतली फाटाफूट थांबवणं आता उद्धव ठाकरेंच्या हातात राहिलेलं नाही अशाही चर्चांना उधाण आलं आहे.

Maharashtra Higher Education Minister Uday Samant Eknath Shinde has joined the group
आमदारांचे निलंबन अन् गटनेतेपदावरुन वाद, एकनाथ शिंदे सर्वोच्च न्यायालयात जाणार?

शिवसेनेत उद्धव ठाकरेंनी ठरवलेलं दिसतं आहे की आपल्यासोबत मंत्री राहणार नाहीत. त्यामुळे ते पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. शिवसेना आक्रमक होऊनही त्यांच्या मंत्र्यांना ते थांबवू शकलेले नाहीत हे वास्तव आहे. आता या सगळ्या सत्तानाट्यात नेमकं काय काय घडणार हे पाहणं नक्कीच महत्त्वाचं ठरणार आहे. तसंच शिवसेनेला फुटण्यापासून वाचवण्याचं सर्वात मोठं आव्हान हे उद्धव ठाकरेंसमोर आहे.

राज्यात राजकीय घडामोडी सुरू असताना मंत्री उदय सामंत शिवसेनेच्या प्रत्येक बैठकीला उपस्थित राहत होते. शुक्रवारी (ता. २४) पाली येथील निवासस्थानी मंत्री उदय सामंत यांनी दिवसभर पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्त्यांशी सल्लामसलत केली. कुटुंबीयांशीही चर्चा केली. या चर्चेतील प्रतिसादाचा अंदाज घेऊन सामंत लवकरच भावी राजकीय दिशा ठरवतील, असा अंदाज मांडला जात होता.

रविवारी दुपारी सोशल मीडियावर सामंत गुवाहटीला रवाना झाल्याचे समजले आणि कार्यकर्त्यांना धक्का बसला. यामुळे रत्नागिरीसह जिल्ह्यात चर्चांना उधाण आले. एका व्हॉटअप ग्रुपवर ते सुरत मार्गे रवाना झाल्याचीही चर्चा रंगली होती.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in