‘हलाल’ पद्धतीवरून मनसेचा गंभीर दावा; नेमकं हलाल म्हणजे काय माहिती आहे का?

मुंबई तक

मटण म्हणलं की मांसाहार करणाऱ्या लोकांच्या तोंडाला पाणी सुटतो. मग तो तांबडा-पांढऱ्या रस्स्यासोबत असो किंवा सावजीसोबत. लोक मटण चवीने खातात. मात्र आता खाण्यावरून नवीन वादाला तोंड फुटू शकतो. त्याचं कारण म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून हलालसंबंधी मोठं विधान करण्यात आलं आहे. हलाल मटनातून मिळणारा पैसा टेरर फंडींगसाठी करण्यात येतो, असा दावा मनसेचे पदाधिकारी यशवंत किल्लेदार यांच्याकडून […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मटण म्हणलं की मांसाहार करणाऱ्या लोकांच्या तोंडाला पाणी सुटतो. मग तो तांबडा-पांढऱ्या रस्स्यासोबत असो किंवा सावजीसोबत. लोक मटण चवीने खातात. मात्र आता खाण्यावरून नवीन वादाला तोंड फुटू शकतो. त्याचं कारण म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून हलालसंबंधी मोठं विधान करण्यात आलं आहे. हलाल मटनातून मिळणारा पैसा टेरर फंडींगसाठी करण्यात येतो, असा दावा मनसेचे पदाधिकारी यशवंत किल्लेदार यांच्याकडून करण्यात आलला आहे.

यापूर्वीही हलाल मटणावर घेण्यात आलं होतं आक्षेप

यापूर्वी देखील अनेकवेळा हलाल मटनाबाबत आक्षेप घेण्यात आलं आहे. भारतीय क्रिकेट बोर्ड नियामक मंडळाने म्हणजेच बीसीसीआयने खेळाडूंच्या डायटमध्ये हलाल मटणचं द्यावं, असं सांगितलं होतं. त्यामुळे मोठा वाद झाला होता. तर यापूर्वी कर्नाटक येथील भाजपचे महासचिव सीटी रवी यांनी हलाल मटण म्हणजे आर्थिक जिहाद असल्याचं म्हटलं होतं. हिंदुंनी हलाल मटण खाऊ नये असं आवाहनही रवी यांनी केलं होतं. हिंदुत्वादी संघटनांनी हलाल मटणाला पूर्वीपासून विरोध केला आहे.

अनेकवेळा उपस्थित होतोय ‘हलाल’वरुन वाद

हलाल ही पद्धत मुस्लिम धर्मीयांमध्ये आहे. एका विशिष्ट प्रकारे प्राण्याची कत्तल केली जाते. ज्याला इस्लाममध्ये योग्य असल्याचं म्हटलं जातं. तर ही पद्धत चुकीची असून यात प्राण्याला यातना होते, असं काहींचं म्हणणं आहे. त्यामुळे याला पर्याय म्हणून झटका पद्धत समोर आली आहे. शीख समुदायात मागील काही वर्षांपासून झटका पद्धतीने कापण्यात आलेल्या प्राण्यांचं मटण खाल्लं जात आहे. तर काही हिंदुत्वादी संघटनांनी झटका पद्धतीनेच कापण्यात आलेल्या मटणाचं सेवन करावं, असं आवाहन केलं आहे.नेमकी ‘हलाल’ पद्धत म्हणजे काय?

नेमकी ‘हलाल’ पद्धत म्हणजे काय?

हलाल पद्धत म्हणजे प्राण्याला कापताना मात्र बळी देताना त्यांची थेट हत्या न करता, प्राण्यांच्या मानेची विशिष्ट शीर कापली जाते. ह्या प्रकारात प्राणी कापण्याआधी तब्येतीने ठणठणीत असणे त्याला कुठलाही आजार नसणे हे जास्त महत्वाचे मानले जाते. कापण्यापूर्वी प्राणी बेशुद्ध अवस्थेत नसायला पाहिजे. प्राणी कापताना दुसऱ्या प्राण्याने पाहू नये म्हणून एका वेळेस एकच प्राणी कापला जातो. ज्यात बिस्मिल्लाह, अल्लाहू अकबर म्हणून श्वसनलिकेपासून कापायला सुरुवात केली जाते. सर्व रक्त वाहून गेल्यानंतर मग कापण्याची पुढील प्रक्रिया केली जाते. याला इस्लाममध्ये हलाल पद्धत मानली जाते.

हे वाचलं का?

    follow whatsapp