राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका आली समोर; बैठक संपताच अजित पवारांनी सांगितला पुढचा प्लान
एकनाथ शिंदेंसह इतर काही आमदारांनी बंडखोरी केल्यानं ठाकरे सरकारच्या स्थैर्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. बंडखोर आमदारांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची मागणी केलीये. त्यामुळे आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूमिकेकडे लक्ष लागलं होतं. आज राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक झाली. या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भूमिका स्पष्ट केली. अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, “शरद पवार यांच्या उपस्थित प्रदेशाध्यक्ष, […]
ADVERTISEMENT

एकनाथ शिंदेंसह इतर काही आमदारांनी बंडखोरी केल्यानं ठाकरे सरकारच्या स्थैर्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. बंडखोर आमदारांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची मागणी केलीये. त्यामुळे आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूमिकेकडे लक्ष लागलं होतं. आज राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक झाली. या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भूमिका स्पष्ट केली.
अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, “शरद पवार यांच्या उपस्थित प्रदेशाध्यक्ष, प्रांत अध्यक्ष, खासदार आणि आमदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीला सर्वजण उपस्थित होते. आता सध्या महाराष्ट्रात जी काही राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे. उद्धव ठाकरेंना पूर्णपणे पाठिंबा देऊन राष्ट्रवादी काँग्रेस हे सरकार कसं टिकेल यासाठी प्रयत्न करणार आहोत. तसं काम सुरूये.”
“मी मुख्यमंत्र्यांशी बोललो. ते मातोश्रीवर होते. माझं आदित्य ठाकरेंचा फोन आला होता. आमचं बोलणं झालं. यापेक्षा वेगळी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसची नाही. काही आमदार परत आलेले आहेत. परत आलेल्या आमदारांनी वेगळी भूमिका मांडली आहे. मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात आमदारांना आवाहन केलं होतं. आजही आवाहन केलं,” असं अजित पवार म्हणाले.
“उद्धव ठाकरे राजीनामा देत नाहीत तोपर्यंत…” शरद पवारांनी स्पष्ट केली महाविकास आघाडीची भूमिका
“आमच्या पक्षाची भूमिका आघाडी सरकार टिकवण्याची आहे. आमचे मित्रपक्ष काही विधानं करीत आहेत. अजित पवारांनी निधीबद्दल केलं. अडीच वर्षापूर्वी सरकार अस्तित्वात आलं. ३६ पालकमंत्री त्यात तिन्ही पक्षांच्या पालकमंत्र्यांना समान निधी दिला गेला. कधीही दुजाभाव केला नाही. मी विकास कामात मदत करण्याची भूमिका माझी असते. मी सकाळी कार्यालयात येतो आणि प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतो.”