महात्मा गांधी, इंदिरा गांधी, लालकृष्ण अडवाणी…, जेव्हा पदयात्रांनी बदलले भारताचे राजकीय चित्र

मुंबई तक

भारतातील राजकीय पदयात्रेला मोठा इतिहास आहे. खरं तर राजकारणात जेव्हा जेव्हा एखादा पक्ष किंवा नेता कमकुवत होतो तेव्हा तो अशा पदयात्रा काढतो. कारण अशा दौऱ्यांमध्ये नेत्यांचा जनतेशी थेट संवाद असतो आणि ते अधिकाधिक भागात पोहोचू शकतात. म्हणजेच आज राहुल गांधी जे करत आहेत, तशाच पदयात्रा आपल्या देशात पहिल्यांदाच घडत आहेत असं नाही. याअगोदर काही पदयात्रा […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

भारतातील राजकीय पदयात्रेला मोठा इतिहास आहे. खरं तर राजकारणात जेव्हा जेव्हा एखादा पक्ष किंवा नेता कमकुवत होतो तेव्हा तो अशा पदयात्रा काढतो. कारण अशा दौऱ्यांमध्ये नेत्यांचा जनतेशी थेट संवाद असतो आणि ते अधिकाधिक भागात पोहोचू शकतात. म्हणजेच आज राहुल गांधी जे करत आहेत, तशाच पदयात्रा आपल्या देशात पहिल्यांदाच घडत आहेत असं नाही. याअगोदर काही पदयात्रा त्यांच्या आजी इंदिरा गांधी आणि वडील राजीव गांधी यांनीही काढल्या होत्या. एवढंच काय महात्मा गांधी यांनीही पदयात्रा काढली होती.

आणीबाणी उठवल्यानंतर, 1977 च्या लोकसभा निवडणुकीत इंदिरा गांधींचा दारूण पराभव झाला आणि त्यांची राजकीय कारकीर्द संपुष्टात येईल, असं म्हटले जात होते. त्यानंतर त्यांनी बिहारमधील बेलची येथे जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी बेलची येथे भयंकर जातीय संघर्ष झाला, ज्यामध्ये 14 लोक मारले गेले. बेलचीच्या भेटीचा इंदिरा गांधींना खूप फायदा झाला आणि 1980 मध्ये त्यांनी पुन्हा निवडणूक जिंकली.

भाजपनेही काढली होती यात्रा

1990 मध्ये भाजपने राम मंदिर हा मोठा मुद्दा बनवला होता आणि तो लोकांपर्यंत नेण्यासाठी रथयात्रा काढली होती, ज्याचे नेतृत्व लालकृष्ण अडवाणी करत होते. गुजरातमधील सोमनाथ ते उत्तर प्रदेशातील अयोध्येपर्यंत ही रथयात्रा काढण्यात आली होती. मात्र त्यावेळी बिहारमध्ये ही रथयात्रा थांबवण्यात आली होती. आणि यामागे कायदा आणि सुव्यवस्था असल्याचे सांगण्यात आले. मात्र, या रथयात्रेचा भाजपला प्रचंड फायदा झाला. त्यानंतर 1989 च्या लोकसभा निवडणुकीपेक्षा 1991 मध्ये 35 जागा जास्त जिंकल्या. त्यावेळी 120 जागांसह काँग्रेसनंतर दुसरा सर्वात मोठा भाजप ठरला होता.

माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांनीही काढला होता दौरा

माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांनीही अशीच यात्रा काढली होती. ही गोष्ट 1983 सालची आहे, जेव्हा देशात इंदिरा गांधींचे सरकार होते. आणि विरोधी पक्ष खूपच कमकुवत झाला होता. त्यावेळी चंद्रशेखर यांनी कन्याकुमारी ते दिल्लीतील राजघाट असा 4260 किमीचा प्रवास केला होता. आणि या भेटीतून त्यांना देशातील जनता आणि त्यांच्या समस्या जाणून घ्यायच्या होत्या. जेणेकरून ते काँग्रेस पक्षाला राष्ट्रीय राजकीय व्यासपीठावर आव्हान देऊ शकतील.

हे वाचलं का?

    follow whatsapp