शिंदे सरकारच्या खाते वाटपावरून विरोधकांकडून पहिली प्रतिक्रिया; आदित्य ठाकरेंनी साधला निशाणा
शिंदे आणि फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून 41 दिवसांनंतर मंत्रिमंडळाचा विस्तार झाला त. 5 दिवसांनंतर खातेवाटप करण्यात आले आहे. रविवारी बहुप्रतीक्षित खातेवाटप जाहीर करण्यात आले. यावर आता विरोधकांकडून पहिली प्रतिक्रिया आली आहे. माजी कॅबिनेटमंत्री आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी खाते वाटपानंतर शिंदे आणि फडणवीस सरकारवर निशाणा साधला. जेव्हा शासनावर लक्ष केंद्रित केले जाते आणि प्रशासनावर नाही, […]
ADVERTISEMENT

शिंदे आणि फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून 41 दिवसांनंतर मंत्रिमंडळाचा विस्तार झाला त. 5 दिवसांनंतर खातेवाटप करण्यात आले आहे. रविवारी बहुप्रतीक्षित खातेवाटप जाहीर करण्यात आले. यावर आता विरोधकांकडून पहिली प्रतिक्रिया आली आहे. माजी कॅबिनेटमंत्री आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी खाते वाटपानंतर शिंदे आणि फडणवीस सरकारवर निशाणा साधला. जेव्हा शासनावर लक्ष केंद्रित केले जाते आणि प्रशासनावर नाही, तेव्हा मंत्रिमंडळ विस्तारासाठी 41 दिवस लागतात, असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला आहे.
काय म्हणाले आदित्य ठाकरे?
आदित्य ठाकरे यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून ट्विट करत सरकारला धारेवर धरले. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहलंय, ‘जेव्हा सरकारवर लक्ष केंद्रित केले जाते आणि प्रशासनावर नाही, तेव्हा मंत्रिमंडळ विस्तारासाठी 41 दिवस लागतात. आणि नंतर खाते वाटपासाठी 5 दिवस लागतात. महिला आणि राज्याची राजधानी- मुंबईसाठी प्रतिनिधित्व नसलेल्या वितरणात’, असं आदित्य ठाकरे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय.
मंत्रिमंडळ विस्ताराला 41 आणि खाते वाटपाला 5 लावल्यावरून आदित्य ठाकरेंनी शिंदे आणि फडणवीस सरकारवर तोफ डागलेली पाहायला मिळाली. त्याचबरोबर मंत्रिमंडळात महिलांना स्थान नाही या विषयावर देखील त्यांनी लक्ष केंद्रित केले. यासह राज्याची राजधानी मुंबईमधील एकाही आमदाराला मंत्री न केल्याचा विषय देखील आदित्य ठाकरेंनी काढला.
भाजपला कोणती खाती मिळाली?
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस- गृह, वित्त व नियोजन, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, गृहनिर्माण, ऊर्जा, राजशिष्टाचार