Ashish Shelar : वरळीच्या आमदारांना पेग, पेंग्विन आणि पार्टी शिवाय काहीही दिसत नाही

भाजपचे नेते आणि मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांची आदित्य ठाकरेंवर टीका
MLA from Worli see nothing but pegs, penguins and parties Says Ashish Shelar
MLA from Worli see nothing but pegs, penguins and parties Says Ashish Shelar

वरळीतल्या जांबोरी मैदानात भाजपचे कार्यक्रम होत आहेत. कारण मुंबईकरांशी आमची नाळ जोडली गेली आहे. मुंबईकरांच्या मनात काय आहे हे आम्हाला कळतं. जे टीका करतात त्यांना मुंबईशी काहीही घेणंदेणं नाही. विशेषतः वरळीच्या आमदारांना पेग, पेंग्विन, पार्टी याशिवाय काहीही दिसत नाही असं म्हणत आशिष शेलार यांनी आदित्य ठाकरेंवर टीका केली आहे.

आशिष शेलार यांनी मुंबईतल्या कार्यक्रमांची दिली माहिती

आज आशिष शेलार यांनी दिवाळीनिमित्त मुंबईत कुठले कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत याची माहिती घेण्यासाठी पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत त्यांनी आदित्य ठाकरेंचं नाव न घेता त्यांच्यावर टीका केली आहे. दिवाळी निमित्त जे विविध कार्यक्रम सादर होणार आहेत त्याची माहिती आज आशिष शेलार यांनी दिली. यावेळी वरळीचे आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर आशिष शेलारांनी कडाडून टीका केली.

आशिष शेलार यांनी नेमकं काय म्हटलं आहे आदित्य ठाकरेंबाबत?

''मुंबईकरांशी आमची नाळ जोडली गेली आहे. मुंबईकरांना काय भावतं ते आम्हाला माहित आहे. यांना मुंबईकरांशी काही घेणं देणं नाही. मुंबईतल्या वरळीतल्या आमदारांना तर पेग, पेंग्विन, पार्टी याशिवाय काहीही दिसत नाही. मराठी संस्कृती, मराठी लोककला याबाबत त्यांनी एक कार्यक्रम केला असेल तर तो मला दाखवा. त्यामुळे त्यांनी तर आमच्या बाबत बोलूच नये.'' असं म्हणत आदित्य ठाकरेंवर आशिष शेलार यांनी टीका केली आहे.

आज वरळीच्या कार्यक्रमावरूनही आरोप-प्रत्यारोप होत आहेत. सचिन अहिर यांनी मराठी कलाकारांचा अपमान झाल्याची टीका केली होती. त्यालाही आशिष शेलार यांनी उत्तर दिलं.

आशिष शेलार यांनी काय म्हटलं आहे?

उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा निवडणूक आयोगाकडे जावं. त्यांनी आपल्या पक्षाचं नाव रडकी सेना असं ठेवावं. ते स्वतः कोणत्याही कार्यक्रमाचं नियोजन करत नाहीत. कार्यक्रमात कोणाचाही अपमान झालेला नाही. मराठी माणसांच्या मराठमोळ्या दीपोत्सवात बॉलिवूडमधले कलाकारही येत आहेत, मराठी माणसांसाठी हा अभिमानाचा विषय आहे असं आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in