Vasant More: वसंत तात्यांनी ‘राज’ आंदोलनाचा ठरवून करेक्ट कार्यक्रम केला?
पुणे: राज ठाकरेंनी मनसे कार्यकर्त्यांना मशिदीवरील भोंग्याविरोधात रस्त्यावर उतरण्याचा कार्यक्रम ठरवून दिला. पण लढाईदिवशीच पुण्यातील मनसेचा चेहरा असलेले वसंत मोरे नॉट रिचेबल झाले. आता त्यांनी नॉट रिचेबल असण्याचं कारण स्पष्ट केलं आहे. राज आंदोलनाबद्दल आपला कार्यक्रम आधीच ठरल्याचं सांगितलं आहे. त्यामुळेच वसंत मोरेंचं नेमकं म्हणणं काय, पूर्वनियोजित कार्यक्रम काय ठरला होता, तेच आपण जाणून घेणार […]
ADVERTISEMENT

पुणे: राज ठाकरेंनी मनसे कार्यकर्त्यांना मशिदीवरील भोंग्याविरोधात रस्त्यावर उतरण्याचा कार्यक्रम ठरवून दिला. पण लढाईदिवशीच पुण्यातील मनसेचा चेहरा असलेले वसंत मोरे नॉट रिचेबल झाले. आता त्यांनी नॉट रिचेबल असण्याचं कारण स्पष्ट केलं आहे.
राज आंदोलनाबद्दल आपला कार्यक्रम आधीच ठरल्याचं सांगितलं आहे. त्यामुळेच वसंत मोरेंचं नेमकं म्हणणं काय, पूर्वनियोजित कार्यक्रम काय ठरला होता, तेच आपण जाणून घेणार आहोत.
राज ठाकरेंनी पाडवा मेळाव्यात मशिदीवरील भोंग्याविरोधात जाहीर भूमिका घेतली. पण या भूमिकेला पक्षातूनच विरोध झाला. नाराजीचा सूर उमटला. पुणे दौऱ्यात राज ठाकरेंसोबत सावलीसारखं फिरणारे वसंत मोरे यांनीच मशिदीसमोर हनुमान चालीसा वाजवणं शक्य नसल्याचं सांगितलं. त्यामुळे मोरे राजसाथ सोडणार असल्याच्याही चर्चा रंगल्या होत्या.
या सगळ्या काळात बरंच राजकारण रंगलं होतं. तसंच त्यांना पुण्याचं शहराध्यक्ष पदंही यामुळे गमवावं लागलं होतं. त्यामुळे वसंत मोरे हे आता मनसे सोडणार अशाही चर्चा रंगल्या होत्या. मात्र या सगळ्या चर्चा फेटाळून लावत मोरेंनी ‘राजमार्ग’च आपला मार्ग असल्याचा खुलासा केला. त्यामुळे वसंत मोरे राज ठाकरेंचा आदेश पाळत 4 तारखेच्या भोंगा आंदोलनात मशिदीसमोर हनुमान चालिसा वाजवतील, असं म्हटलं गेलं होतं.