“नुसतीच उणीधुणी! विचारही नाही आणि सोनंही नाही”, उद्धव ठाकरेंच्या भाषणावर मनसेची टीका
शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोघांनीही मुंबईत बुधवारी दसरा मेळावे घेतले. दोन्ही गटाचे मेळावे दणक्यात झाले. शिवाजी पार्क आणि बीकेसी मैदान या ठिकाणी शक्तीप्रदर्शन करण्यात आलं. उद्धव ठाकरेंनी शिवाजी पार्क मैदानावरून जी टीका एकनाथ शिंदे आणि भाजपवर केली त्या टीकेला तोडीस तोड उत्तर एकनाथ शिंदे यांनी दिलं. अशात आता उद्धव ठाकरेंच्या […]
ADVERTISEMENT

शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोघांनीही मुंबईत बुधवारी दसरा मेळावे घेतले. दोन्ही गटाचे मेळावे दणक्यात झाले. शिवाजी पार्क आणि बीकेसी मैदान या ठिकाणी शक्तीप्रदर्शन करण्यात आलं. उद्धव ठाकरेंनी शिवाजी पार्क मैदानावरून जी टीका एकनाथ शिंदे आणि भाजपवर केली त्या टीकेला तोडीस तोड उत्तर एकनाथ शिंदे यांनी दिलं. अशात आता उद्धव ठाकरेंच्या भाषणाबाबत मनसेची प्रतिक्रिया समोर आली आहे.
मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी नेमकं काय म्हटलं आहे?
नुसतीच “उणी”धुणी” “नळ”आणि”भांडण”विचार ही नाही आणि सोनंही नाही. असं वाक्य पोस्ट करत संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरेंच्या भाषणावर टीका केली आहे. राजकारणात घराणेशाही मानता का? यावर उद्धव ठाकरेंनी एका मुलाखतीत दिलेलं उत्तरही संदीप देशपांडे यांनी ट्विट केलं आहे. तसंच भूतकाळ कधीच पिच्छा सोडत नसतो असंही त्यांनी या ट्विटमध्ये म्हटलं आहे. या ट्विटमध्ये उद्धव ठाकरे हे घराणेशाही लादली जाऊ नये या आशयाचं वक्तव्य करताना दिसत आहेत. त्यावरून ही टीका संदीप देशपांडे यांनी केली आहे.
नुसतीच “उणी”धुणी” “नळ”आणि”भांडण”विचार ही नाही आणि सोन ही नाही.
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) October 5, 2022
बोले जैसा चाले त्याची वंदावी पाऊले pic.twitter.com/UgmeB1VjOb
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) October 6, 2022