फडणवीसांच्या बालेकिल्ल्यात ठाकरे भिडणार! नागपूरमधून काँग्रेसची माघार

MLC Election : नागपूर शिक्षक मतदारसंघाची जागा काँग्रेसने शिवसेना (UBT) पक्षाला सोडली आहे.
Uddhav Thackeray vs Devendra Fadnavis
Uddhav Thackeray vs Devendra Fadnavis Mumbai Tak

मुंबई : महाविकास आघाडीचा विधान परिषदेच्या कोकण, नाशिक, औरंगाबाद, अमरावतीनंतर नागपूरचाही पेच सुटला आहे. नागपूर शिक्षक मतदारसंघ आता काँग्रेसने शिवसेना (UBT) साठी सोडला आहे. त्यानंतर इथून उमेदवार म्हणून महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे गंगाधर नाकाडे यांचं नावही शिवसेना (UBT) चे ज्येष्ठ ने सुभाष देसाई यांनी घोषित केलं. त्यामुळे नागपूरमध्ये नागो गाणार विरुद्ध गंगाधर नाकाडे अशी लढत रंगणार आहे.

महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या प्रमुख नेत्यांची आज (११ डिसेंबर) बैठक झाली. यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि सुभाष देसाई यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेऊन याबाबतची घोषणा केली. महाविकास आघाडीच्या सुत्रानुसार काँग्रेस - २ जागा, राष्ट्रवादी - १, शेकाप - १ आणि शिवसेना (UBT) एक जागा लढणार आहे.

महाविकास आघाडीचे उमेदवार कोण असणार?

 • नाशिक पदवीधर - सुधीर तांबे - काँग्रेस

 • अमरावती पदवीधर - धीरज लिंगाडे - काँग्रेस

 • औरंगाबाद शिक्षक - विक्रम काळे - राष्ट्रवादी काँग्रेस

 • कोकण शिक्षक - बाळाराम पाटील - शेकाप

 • नागपूर शिक्षक - गंगाधर नाकाडे - शिवसेना (UBT)

भाजपचे उमेदवार कोण असणार?

 • नाशिक पदवीधर - अद्याप नाव जाहीर नाही.

 • अमरावती पदवीधर - रणजीत पाटील - भाजप

 • औरंगाबाद शिक्षक - किरण पाटील - भाजप

 • कोकण शिक्षक - ज्ञानेश्वर म्हात्रे - भाजप

 • नागपूर शिक्षक - नागो गाणार - अपक्ष (भाजप पुरस्कृत)

निवडणूक जाहीर झालेल्या ५ सदस्यांची मुदत ७ फेब्रुवारी २०२३ रोजी संपणार आहे. यात राष्ट्रवादी १, भाजप १, काँग्रेस १ आणि दोन इतर सदस्यांचा समावेश आहे.

मुदत संपणाऱ्या सदस्यांची नावं :

 • नाशिक पदवीधर - सुधीर तांबे - काँग्रेस

 • अमरावती पदवीधर - रणजीत पाटील - भाजप

 • औरंगाबाद शिक्षक - विक्रम काळे - राष्ट्रवादी काँग्रेस

 • कोकण शिक्षक - बाळाराम पाटील - शेकाप (काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत)

 • नागपूर शिक्षक - नागो गाणार - अपक्ष (भाजप पुरस्कृत)

विधान परिषद निवडणूक कार्यक्रम :

 • अधिसूचना जारी - ५ जानेवारी २०२३

 • उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख - १२ जानेवारी २०२३

 • उमेदवारी अर्जाची छाननी - १३ जानेवारी २०२३

 • उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख - १६ जानेवारी २०२३

 • मतदान - ३० जानेवारी २०२३ (सकाळी ८.०० ते दुपारी ४.००)

 • मतमोजणी - २ फेब्रुवारी २०२३

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in