MP Navneet Rana: CM ठाकरेंची सभेच्या दिवशीच ‘इथे’ करणार हनुमान चालीसा पठण: राणा
नवी दिल्ली: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ या खासगी निवासस्थानी हनुमान चालीसा पठणाची भूमिका घेऊन मुंबईत आलेल्या राणा दाम्पत्याला थेट तुरुंगात जावं लागलं होतं. जवळजवळ 12 दिवस तुरुंगात राहिल्यानंतर जामीनावर सुटलेले राणा दाम्पत्य हे पुन्हा एकदा हनुमान चालीसाचा पठण करणार आहेत. ते देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मुंबईतील सभेच्या दिवशी. स्वत: आमदार रवी राणा आणि […]
ADVERTISEMENT

नवी दिल्ली: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ या खासगी निवासस्थानी हनुमान चालीसा पठणाची भूमिका घेऊन मुंबईत आलेल्या राणा दाम्पत्याला थेट तुरुंगात जावं लागलं होतं. जवळजवळ 12 दिवस तुरुंगात राहिल्यानंतर जामीनावर सुटलेले राणा दाम्पत्य हे पुन्हा एकदा हनुमान चालीसाचा पठण करणार आहेत. ते देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मुंबईतील सभेच्या दिवशी. स्वत: आमदार रवी राणा आणि त्यांच्या पत्नी खासदार नवनीत राणा यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन याबाबतची घोषणा केली आहे.
हनुमान चालीसा पठणावरुन मुंबईत झालेला एकूणच राडा आणि त्यानंतर झालेली अटकेची कारवाई यानंतरही राणा दाम्पत्य आपल्या भूमिकेवर ठाम आहे. मात्र, आता राणा दाम्पत्यांनी हनुमान चालीसा पठणासाठी थेट दिल्ली गाठली आहे. मुख्यमंत्री सभेच्या दिवशीच राणा दाम्पत्य हे दिल्लीतील प्राचीन हनुमान मंदिरात आरती करुन हनुमान चालीसाचं पठण करणार आहेत. याबाबतची घोषणा करताना राणा दाम्पत्याने मुख्यमंत्र्यांवर बरीच टीका केली आहे.
पाहा नवनीत-रवी राणांनी मुख्यमंत्री ठाकरेंवर नेमकी काय टीका केलीय?
‘बाळासाहेबांनी हिंदुत्व मजबूत करण्यासाठी काम केलं. पण तुम्ही इंग्रजांनी तयार केलेल्या कायद्याचा वापर करुन जे लोकं धर्माचा प्रचार करतात, बजरंग बली, रामाचं नाव घेतात त्या निष्पक्ष लोकांना तुम्ही जेलमध्ये टाकायचं काम करत आहात.’