‘समृद्धीवर कोणी गेलं की लोकं म्हणतात देवेंद्रवासी झाला…’, शरद पवार असं का म्हणाले?
समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातातबाबत प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अतिशय टोकदार शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.
ADVERTISEMENT

Maharashtra Political News in Marathi: पुणे: बुलढाणात (Buldhana) समृद्धी महामार्गावर (Samruddhi Highway) झालेल्या बस अपघातात (Bus Accident) 25 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यावरुन आता या महामार्गामध्ये काही तांत्रिक दोष असल्याचे म्हटलं जात आहे. याच घटनेबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी प्रतिक्रिया देताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना जोरदार टोलाही हाणला. ‘जर अपघातात एखादी व्यक्ती गेली तर महामार्गाच्या नजीकच्या गावातील काही लोकं असं म्हणतात की तो देवेंद्रवासी झाला..’ असं म्हणत पवारांनी खास त्यांच्या शैलीत याबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते. (ncp chief sharad pawar criticized dcm devendra fadnavis very sharp words buldhana bus accident samruddhi highway maharashtra politics news latest)
‘…तर लोकं म्हणतात देवेंद्रवासी झाला’
‘समृद्धी महामार्गावर अनेक अपघात झाले ही गोष्ट खरी आहे परंतु दुर्दैवाने या महामार्गावर सातत्याने कुठे ना कुठे अपघात होत आहेत. हे गेले काही महिने बघायला मिळते आहे. मध्यंतरी मी त्या भागात गेलो होतो.. या रस्त्याने जावं हे मी ठरवलं. मी माझा मार्ग बदलला.. आणि त्या रस्त्याने जात असताना तिथे काही लोक होते म्हणून गाडी थांबवली… नाही तर कुठे लोकंही भेटत नाही त्या रस्त्यावर.. त्या लोकांना विचारलं की, तुमचा अनुभव काय..’
‘त्यांनी सांगितलं की, ‘या रस्त्याच्या संबंधीची महाराष्ट्रात फार चर्चा झाली होती, फार उदोउदो झाला. पण आम्हाला सातत्याने एखाद-दुसरा अपघात बघायला मिळतो. त्याचं कारण कदाचित… या महामार्गाचं शास्त्रियदृष्ट्यानियोजन केलेलं नसावं. त्याचा दुष्परिणाम लोक मृत्युमुखी पडत आहेत.’
‘लोक कळत-नकळत त्यांना दोषी ठरवतात’
‘आमच्या गावात आता चर्चा अशी आहे की,.. ते लोकं सांगत होते.. एखाद-दुसरी व्यक्ती अपघाताने गेली.. तर लोक असं म्हणतात या अपघातात एक देवेंद्रवासी झाला.’ असं म्हणत या महामार्गात काही दोष असल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
