‘मंगेश चव्हाण, तु कल का छोकरा है, तुझं वय नाही तेवढं नाथाभाऊचं राजकारण’ : एकनाथ खडसे

मुंबई तक

जळगाव : जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघातील कथित गैरव्यवहारांवरुन सुरु झालेला भाजप आमदार मंगेश चव्हाण आणि राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे. खडसे यांनी नुकत्याच केलेल्या ठिय्या आंदोलनावर, तुरुंगात जाण्यापूर्वी तुरुंगाच्या बाहेर राहून तुरुंगात गेल्यावर कसं वाटतं याची प्रॅक्टिस त्यांनी केली असल्याचा टोला नुकताच आमदार चव्हाण यांनी लगावला होता. त्यावर प्रतिक्रिया देताना […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

जळगाव : जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघातील कथित गैरव्यवहारांवरुन सुरु झालेला भाजप आमदार मंगेश चव्हाण आणि राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे. खडसे यांनी नुकत्याच केलेल्या ठिय्या आंदोलनावर, तुरुंगात जाण्यापूर्वी तुरुंगाच्या बाहेर राहून तुरुंगात गेल्यावर कसं वाटतं याची प्रॅक्टिस त्यांनी केली असल्याचा टोला नुकताच आमदार चव्हाण यांनी लगावला होता. त्यावर प्रतिक्रिया देताना खडसे यांनी, तुम्ही वर्ष-दोन वर्षांपासून नाथाभाऊची जेलमध्ये जाण्याची वाट बघत आहात. पण तुम्ही त्याची काळजी करु नका. मी बाहेरचं राहणार आहे, असं म्हणतं आमदार चव्हाण यांच्यावर विविध आरोप करतं त्यांच्या कथित व्यवहारांचा पाढा वाचला.

एकनाथ खडसे म्हणाले, तुम्ही वर्ष-दोन वर्षांपासून नाथाभाऊची जेलमध्ये जाण्याची वाट बघत आहात. पण तुम्ही त्याची काळजी करु नका. मी बाहेरचं राहणार आहे. मी काय गुन्हा केलेला नाही. मी काय तुझ्यासारख्या चोऱ्यामाऱ्या, लबाड्या केलेल्या नाहीत. मी कोणाच्या जमिनी हडप केलेल्या नाहीत. तुमच्या सुरेशदादा जैनचे व्यवहार झाले तेही मला माहित आहे. कोणाबरोबर साखर कारखान्यांचे व्यवहार झाले हे मला माहित आहे. याच्या सगळ्या तक्रारी ईडीकडे केल्या आहेत. पण त्या तुम्ही कशा दाबल्या याची मला पूर्वकल्पना आहे. पण या सगळ्यावर नाथाभाऊ काय बोलणार. तु तो कल का छोकरा है, तुझं जेवढं वय नाही तेवढं नाथाभाऊचं राजकारणातील वय आहे.

एकनाथ खडसेंचा रात्रभर पोलीस ठाण्यात मुक्काम, अधिकाऱ्याच्या टेबलवरच केलं जेवण; काय घडलंय?

दरम्यान, आमदार चव्हाण यांनी माध्यमांशी बोलताना खडसे यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक जळगांव इथं यावं. सर्व सभासदांसमोर काय ते ‘दूध का दूध पानी का पानी’ करावं, असं आव्हान त्यांनी दिलं होतं. तसंच त्यांनी सगळी समाधानकारक उत्तर दिली तर मी त्यांची जाहीर माफी मागतो. जर ते दोषी असतील तर त्यांनी तिथचं राजीनामा द्यावा, असंही चव्हाण यांनी म्हटलं होतं.

हे वाचलं का?

    follow whatsapp