'बाळासाहेबांऐवजी मोदी-शहा यांच्या नावाने चिन्हाची मागणी करा'; अमोल मिटकरींनी शिंदे गटाला डिवचलं

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी मंगळवारी बारामतीत दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
NCP MLA Amol Mitkari has warned the Shinde group that they will show their strength
NCP MLA Amol Mitkari has warned the Shinde group that they will show their strength

वसंत मोरे, बारामती

शिवसेनेचे अधिकृत धनुष्यबाण हे चिन्ह निवडणूक आयोगानं गोठवलं आहे. शिवसेनेला 'मशाल' हे निवडणूक चिन्ह तर 'शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे' हे नाव मिळाले आहे. असे असताना शिंदे गट ही बाळासाहेब ठाकरेंच्या नावाची मागणी करून चिन्हाची मागणी करत आहेत. मात्र आमचे त्यांना आव्हान आहे की, बाळासाहेब ठाकरे ऐवजी नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्या नावाने चिन्हाची मागणी करा. तुम्हाला ताकद दिसून येईल, असा टोला राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी शिंदे गटाला लगावला आहे. सोमवारी शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव मिळालं आहे. आता चिन्हाबाबत आज निर्णय होईल. यावर बोलताना मिटकरींनी शिंदे गटाला टोला लगावला.

मशाल हे क्रांतीचे प्रतीक आहे : मिटकरी

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी मंगळवारी बारामतीत दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावर बोलताना मिटकरी म्हणाले की, जनसंघ, काँग्रेस, या पक्षांनाही वेगवेगळी चिन्हे बदलावी लागली. त्यामुळे फारसा फरक पडला नाही. बाळासाहेब ठाकरे हे नाव ज्या ठिकाणी आहे, तेथे शिवसेनिकांचे रक्त सळसळल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे मशाल चिन्हालाच लोक पसंती देतील. मशाल हे जसे क्रांतीचे प्रतीक आहे, तसेच शिवसेनाही क्रांतीचे प्रतीक आहे. मित्रपक्ष म्हणून आमचा शिवसेनाला पाठिंबा असल्याचे मिटकरी यांनी सांगितले

शिवतारेंवर साधला निशाणा

राष्ट्रवादीने शिवसेना संपवली असा आरोप शिंदे गटाचे माजी मंत्री विजय शिवतारे यांनी केला होता. यावर बोलताना मिटकरी म्हणाले की, याउलट माझा त्यांना माझं असं म्हणणं आहे की, भावना गवळी, अनंतराव अडसूळ, प्रतापराव जाधव ही सर्व मंडळी ईडीच्या धाकाने शिंदे गटात जाऊन बसले. शिवतारे यांचे आता वय वाढले. त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे,अशी टीका विजय शिवतारेंवर अमोल मिटकरींनी केली.

शिवसेनेत फूट पडल्याने ठाकरे आणि शिंदे गटात मोठा वाद सुरु आहे. पक्षापासून चिन्हावर दोन्ही गटाकडून दावा केला जातोय. त्यामुळे हा वाद न्यायालयात गेला आहे. बाप चोरल्याचा आरोप ठाकरेंकडून होतोय तर आम्ही बाळासाहेबांच्या विचाराचे वारसदार असल्याचं शिंदेंकडून सांगण्यात येतंय. अशा परिस्थितीत अंधेरी पूर्वची पोटनिवडणूक जाहीर झालीय. म्हणून चिन्हाचा प्रश्न मिटवणं गरजेचं होतं. मात्र पक्षाबाबत अंतिम निर्णय येईपर्यंत निवडणूक आयोगानं धनुष्यबाण चिन्ह गोठवलं.

ठाकरेंना मशाल चिन्ह मिळालाय तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव मिळालं आहे. तर शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना असं नाव मिळालं आहे तर धार्मिक प्रतीक असलेले चिन्ह मागितल्याने ते रद्द करून मंगळवारी 3 चिन्ह सुचवायला सांगितले आहे. सूर्य, ढाल आणि तलवार व पिंपळाचं झाड शिंदे गटाकडून मागण्यात आलाय. आता त्यांना कोणता चिन्ह मिळतो हे पाहून औत्सुक्याचं ठरणार आहे. यासगळ्यादरम्यान मात्र अमोल मिटकरींनी मोदी-शहा यांचं नाव जोडून शिंदे गटाला डिवचलं आहे

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in