“२० लाखांसाठी २ लाख” : जयंत पाटलांसमोरच अमोल मिटकरींवर कमिशनखोरीचा आरोप

मुंबई तक

अकोला : राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे निकटवर्तीय समजले जाणाऱ्या अमोल मिटकरी यांची पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासमोरच मोठी नाचक्की झाली आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अकोल्याचे जिल्हाध्यक्ष यांच्याकडूनच मिटकरी यांच्यावर उघडपणे कमिशनखोरीचे आरोप करण्यात आले आहेत. या आरोपांचा व्हिडीओ ‘मुंबई तक’च्या हाती लागला आहे. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींवर राष्ट्रवादी युवक […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
google news

अकोला : राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे निकटवर्तीय समजले जाणाऱ्या अमोल मिटकरी यांची पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासमोरच मोठी नाचक्की झाली आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अकोल्याचे जिल्हाध्यक्ष यांच्याकडूनच मिटकरी यांच्यावर उघडपणे कमिशनखोरीचे आरोप करण्यात आले आहेत. या आरोपांचा व्हिडीओ ‘मुंबई तक’च्या हाती लागला आहे.

अकोला जिल्ह्यातील मुर्तिजापूर येथे राष्ट्रवादी काँग्रेसची आढावा बैठक पार पडली. याच आढावा बैठकीत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासमोरच पदाधिकाऱ्यांनी अमोल मिटकरींविरोधातील तक्रारींचा पाढा वाचला आहे. दरम्यान मिटकरी यांच्याविरोधातील तक्रारी आणि आरोप सुरु असतानाच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्हिडीओ शुटींग बंद करण्याची सुचना केल्याचेही व्हिडीओमधून दिसून येत आहे.

“राज आणि आमचे वैचारिक साम्य” : भाजप मनसे युतीचे बावनकुळेंचे संकेत

हे वाचलं का?