Viral Video : मनुस्मृती जाळून चिकन शिजवणारी अन् सिगारेट ओढणारी ही तरुणी कोण?
शेखपूरा : मनुस्मृतीचे दहन करून सिगारेट ओढताना आणि चिकन शिजवताना एका मुलीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. प्रिया दास (Priya Das) असं या तरुणीचं नाव असून ती बिहारमधील (Bihar) शेखपुरा इथं राहणारी आहे. २७ वर्षीय प्रिया दास या राष्ट्रीय जनता दलाच्या (आरजेडी) महिला सेलमध्ये राज्य सचिव आहेत. (In the viral video, Priya Das is smoking cigarette […]
ADVERTISEMENT

शेखपूरा : मनुस्मृतीचे दहन करून सिगारेट ओढताना आणि चिकन शिजवताना एका मुलीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. प्रिया दास (Priya Das) असं या तरुणीचं नाव असून ती बिहारमधील (Bihar) शेखपुरा इथं राहणारी आहे. २७ वर्षीय प्रिया दास या राष्ट्रीय जनता दलाच्या (आरजेडी) महिला सेलमध्ये राज्य सचिव आहेत. (In the viral video, Priya Das is smoking cigarette by burning Manusmriti and cooking chicken on a stove.)
‘आज तक’ने प्रिया दास या संपर्क करुन मनुस्मृती जाळण्यामागील उद्देश विचारला असता, त्यांनी सांगितलं की तिने मनुस्मृती सुमारे ५०० रुपयांना विकत घेतली होती. मनुस्मृतीत असं लिहिलं आहे की, जर एखाद्या महिलेने दारु प्यायली तर तिला अनेक प्रकारच्या शिक्षा होऊ शकतात. तसंच न्याय करण्याआधी संबंधितांची जात जाणून घेण्याबाबतही उल्लेख केला आहे.
मी नॉनव्हेज खात नाही, सिगारेट ओढत नाही :
मनुस्मृती जाळण्याचा आणि चिकन शिजवण्याचा व्हिडिओ ट्विटरवर आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे. मनुस्मृती जाळणं चुकीचं असल्याचं शेकडो लोकांनी म्हटलं आहे. मात्र, अनेक लोकांनी प्रियाच्या सिगारेट ओढण्यास आणि चिकन शिजवण्यालाही विरोध केला आहे. पण ‘आज तक’शी बोलताना प्रिया दास म्हणते, मी नॉनव्हेज खात नाही आणि सिगारेटही ओढत नाही. याचा अर्थ कदाचित, प्रिया दास व्हिडिओमध्ये प्रिया दास चिकन करणं आणि धूम्रपान करणं हे केवळ निषेध नोंदवण्यासाठी दिसत आहे.
राजकारणासोबतच प्रिया शिक्षण घेत आहे आणि शिक्षिका बनण्यासाठी तिचे प्रयत्न सुरु आहेत. प्रिया सीटीईटी उत्तीर्ण झाली आहे. पीएचडीसाठीही तिचे प्रयत्न सुरु असल्याचे तिने सांगितलं.