संजय राऊत, दानवेंच्या अडचणी वाढणार? नितेश राणेंची विधिमंडळ सचिवांकडे तक्रार
संजय राऊत आणि अंबादास दानवे यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याबद्दल केलेल्या विधानांवर भाजप आमदार नितेश राणे यांनी आक्षेप घेतला आहे. त्यांनी दोन्ही नेत्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
ADVERTISEMENT

Nitesh Rane Sanjay Raut : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याबद्दल केलेल्या विधानांमुळे खासदार संजय राऊत आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे अडचणीत येण्याची शक्यता आहे. भाजप आमदार नितेश राणे यांनी थेट विधिमंडळ सचिवांना पत्र लिहिलं आहे. विशेषाधिकार भंग केल्या प्रकरणी कारवाई करण्याची मागणी नितेश राणेंनी केली आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केलेल्या विधानांवर आमदार नितेश राणे यांनी बोट ठेवलं आहे. याबद्दल त्यांनी विधिमंडळ सचिवांना पत्र पाठवलं आहे.
आमदार नितेश राणेंच्या पत्रात काय?
नितेश राणेंनी पत्रात म्हटलंय की, राज्यसभा सदस्य संजय राऊत यांनी नजिकच्या काळात विधानसभा अध्यक्षांसंदर्भात पुढील वक्तव्ये केली आहेत.
1) “संविधान, कायदा व विधीमंडळाशी बेईमानी करुन वेळकाढूपणा चाललाय. घटनात्मक पदावर बसलेले विधानसभा अध्यक्ष घटनाबाह्य सरकारला चालवित आहेत काय?”
समजून घ्या >> Women Reservation : 5 कारणं… महिलांना राजकारणात 33 टक्के आरक्षण का आवश्यक?
2) “आम्ही करु ते खरं अशी बादशाही विधानसभा अध्यक्ष करीत असतील तर ती बादशाही बुडाल्याशिवाय रहाणार नाही.”










