“नितीन गडकरींना आडवाणी होण्याची चिंता सतावत नाहीये ना”; गडकरींच्या विधानांची का होतेय चर्चा?
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या भाषणाची चर्चा तर नेहमीच होत असते. जुने किस्से ऐकवत नितीन गडकरी वेगवेगळ्या विषयांवर भाष्य करताना दिसतात. मात्र, गेल्या काही दिवसांपासून नितीन गडकरींकडून गेल्या जाणाऱ्या विधानांचा सद्य राजकीय स्थितीशी संबंध लावले जात असून, त्याचे वेगवेगळे अर्थ काढले जात आहे. सोशल मीडियावर विविध मत-मतांतरे व्यक्त होताना दिसताहेत. नागपुरात एका कार्यक्रमात नितीन गडकरींची मुलाखत […]
ADVERTISEMENT

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या भाषणाची चर्चा तर नेहमीच होत असते. जुने किस्से ऐकवत नितीन गडकरी वेगवेगळ्या विषयांवर भाष्य करताना दिसतात. मात्र, गेल्या काही दिवसांपासून नितीन गडकरींकडून गेल्या जाणाऱ्या विधानांचा सद्य राजकीय स्थितीशी संबंध लावले जात असून, त्याचे वेगवेगळे अर्थ काढले जात आहे. सोशल मीडियावर विविध मत-मतांतरे व्यक्त होताना दिसताहेत.
नागपुरात एका कार्यक्रमात नितीन गडकरींची मुलाखत झाली. या कार्यक्रमात नितीन गडकरींनी वेगवेगळ्या मुद्द्यांवर भाष्य केलं. याच कार्यक्रमात नितीन गडकरींनी कुणाचा वापर करून त्याला बाजूला करणं चांगली गोष्ट नाही, असंही म्हटलं. त्याचबरोबर पराभवाने माणूस संपत नाही, जेव्हा तो लढायचं सोडतो तेव्हा माणूस संपतो, असंही गडकरी म्हटले.
नितीन गडकरी यांची भाषणातील विधानांचा संबंध सोशल मीडियावर आणि राजकीय वर्तुळात भाजपत सुरू असलेल्या घडामोडींशी लावला जाताना दिसतोय. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी याच विधानांवर बोट ठेवत एक ट्विट केलंय. एका ओळीत केलेल्या या ट्विटमध्ये त्यांनी लालकृष्ण आडवाणी यांचाही उल्लेख केला आहे.
‘सरकार वेळेवर निर्णय घेत नाही, हाच प्रॉब्लेम’; नितीन गडकरींनी मोदी सरकारचे टोचले कान?