Kirit Somaiya: सोमय्यांची ती जखम खरी की खोटी?, रुग्णालयाचा रिपोर्ट आला समोर
मुंबई: राणा दाम्पत्याला खार पोलिसांनी अटक केल्यानंतर त्यांना भेटण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये गेलेल्या भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या गाडीवर काही शिवसैनिकांनी दगडफेक केली होती. यावेळी शिवसैनिकांकडून आपल्या हत्येचा प्रयत्न केला गेला असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता. या हल्ल्यानंतर सोमय्या यांच्या हनुवटीमधून रक्त येत असल्याचं काही फोटोंमधून दिसतं होतं. मात्र, सोमय्यांची ही जखम खोटी असल्याचा […]
ADVERTISEMENT

मुंबई: राणा दाम्पत्याला खार पोलिसांनी अटक केल्यानंतर त्यांना भेटण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये गेलेल्या भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या गाडीवर काही शिवसैनिकांनी दगडफेक केली होती. यावेळी शिवसैनिकांकडून आपल्या हत्येचा प्रयत्न केला गेला असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता. या हल्ल्यानंतर सोमय्या यांच्या हनुवटीमधून रक्त येत असल्याचं काही फोटोंमधून दिसतं होतं. मात्र, सोमय्यांची ही जखम खोटी असल्याचा दावा शिवसेनेने केला होता. दरम्यान, आता याचबाबत भाभा रुग्णालयाचा एक रिपोर्ट समोर आल्याचं सूत्रांकडून समजतं आहे.
राणा दाम्पत्य हे दोन समाजामध्ये तेढ निर्माण केल्याच्या गुन्ह्याप्रकरणी अटकेत होते, 23 एप्रिललाच खार येथील त्यांच्या राहत्या घरातून राणा दाम्पत्याला खार पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. कारण राणा दाम्पत्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घरासमोर हनुमान चालीसा म्हणायची होती आणि त्यामुळे अनेक शिवसैनिक रस्त्यावर उतरले होते.
त्याचं झालं असं राणा दाम्पत्याला भेटल्यानंतर किरीट सोमय्या रात्री 10 च्या सुमारात पोलीस स्टेशनच्या बाहेर होते. त्याआधीपासूनच खार पोलीस स्टेशनच्या बाहेर अनेक शिवसैनिक जमले होते. त्यामुळे सोमय्या येताच अनेक शिवसैनिक आक्रमक झाले आणि आक्रोश करण्यास सुरुवात केली.
त्याचवेळी सोमय्यांची गाडी पोलीस स्टेशनच्या बाहेर आली आणि सोमय्यांच्या गाडीच्या काचेवर एक वस्तू फेकली गेली, किरीट सोमय्या ज्या बाजूला बसले होते, त्याच बाजूची काच फुटली आणि सोमय्यांना जखम झाली, असं चित्र या व्हिडीओतून समोर येतं आहे. यावर सोमय्यांनी शिवसैनिकांनी आपला जीव घेण्याचा प्रयत्न केला असा गंभीर आरोप केला होता.