राहुल गांधी किलोऐवजी लिटर म्हणाल्याने सोशल मीडियावर ट्रोल; व्हिडीओ होत आहे व्हायरल

मुंबई तक

राहुल गांधी यांनी रविवारी दिल्ली येथे काँग्रेसच्या हल्लाबोल मोर्च्याला संबोधित केले. यावेळी त्यांनी भाजप आणि केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला. दूध, मैदा, गॅस सिलिंडर, मोहरीचे तेल आणि पेट्रोल-डिझेलच्या किमती अनेक पटींनी वाढल्याचे त्यांनी सांगितले. यादरम्यान त्यांची जीभ अशा प्रकारे घसरली की, ते आता प्रचंड ट्रोल होत आहेत. त्यांचा व्हिडिओही व्हायरल होत आहे. काय म्हणाले होते […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

राहुल गांधी यांनी रविवारी दिल्ली येथे काँग्रेसच्या हल्लाबोल मोर्च्याला संबोधित केले. यावेळी त्यांनी भाजप आणि केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला. दूध, मैदा, गॅस सिलिंडर, मोहरीचे तेल आणि पेट्रोल-डिझेलच्या किमती अनेक पटींनी वाढल्याचे त्यांनी सांगितले. यादरम्यान त्यांची जीभ अशा प्रकारे घसरली की, ते आता प्रचंड ट्रोल होत आहेत. त्यांचा व्हिडिओही व्हायरल होत आहे.

काय म्हणाले होते राहुल गांधी?

राहुल गांधी काही वर्षे जुन्या पिठाच्या किमती आणि आजच्या किमतीची तुलना करत होते. त्याच वेळी, ते किलोऐवजी लिटर बोलले. ते म्हणाले की, पूर्वी 22 रुपये लिटरने पीठ मिळत होते, आज ते 40 रुपये लिटरने विकले जात आहे. त्यानंतर त्यांनी आपली चूक सुधारली. मात्र तोपर्यंत त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि सोशल मीडियावर ते प्रचंड ट्रोल होत आहेत.

संपूर्ण व्हिडीओ आला समोर

हे वाचलं का?

    follow whatsapp