महाराष्ट्रापासून ते हरयाणापर्यंत आमदारांची ‘लपवाछपवी’!, 4 राज्यात का चुकलंय राज्यसभेचं गणित?
राज्यसभा निवडणूक बिनविरोध होणार हे स्पष्ट झाल्यानंतर महाराष्ट्रातीलच नाही, तर देशातील राजकारण ढवळलं गेलंय. राज्यसभेच्या ५७ जागांसाठी १० जून रोजी मतदान होत आहे. चार राज्यांत चार जागांवर पेच अडकलेला असून, राजकीय पक्षांना घोडेबाजार आणि क्रॉस व्होटिंगची भीती सतावत आहे. त्यामुळेच आमदारांचा लपवाछपवी करण्यात राजकीय नेते बेजार झालेत. राजकीय पक्षाचं सगळं लक्ष्य सध्या राजसभा निवडणुकीवर केंद्रीत […]
ADVERTISEMENT

राज्यसभा निवडणूक बिनविरोध होणार हे स्पष्ट झाल्यानंतर महाराष्ट्रातीलच नाही, तर देशातील राजकारण ढवळलं गेलंय. राज्यसभेच्या ५७ जागांसाठी १० जून रोजी मतदान होत आहे. चार राज्यांत चार जागांवर पेच अडकलेला असून, राजकीय पक्षांना घोडेबाजार आणि क्रॉस व्होटिंगची भीती सतावत आहे. त्यामुळेच आमदारांचा लपवाछपवी करण्यात राजकीय नेते बेजार झालेत.
राजकीय पक्षाचं सगळं लक्ष्य सध्या राजसभा निवडणुकीवर केंद्रीत झालंय. त्यामुळेच महाराष्ट्र असो की हरयाणा… सगळी आमदारांना रिसॉर्ट, हॉटेलमध्ये ठेवण्यासाठीचीच धावपळ सुरूये. राजस्थानात काँग्रेसने पक्षातील आणि समर्थक आमदार उदयपूरच्या रिसॉर्टमध्ये ठेवले आहेत. तर भाजपने जयपूर बाहेर असलेल्या एका सिसॉर्टमध्ये. महाराष्ट्र, हरयाणा, कर्नाटकात यापेक्षा वेगळं चित्र नाहीये.
राज्यात काय आहे पेच?
– राजस्थानात राज्यसभेच्या चार जागांसाठी निवडणूक होत आहे. त्यात काँग्रेसला दोन, तर भाजपला एक जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर चौथ्या जागेवरील भाजप समर्थित अपक्ष उमेदवार सुभाष चंद्रा यांच्यामुळे पेच निर्माण झालाय.