Rajya sabha : आजाराने त्रस्त असूनही भाजपचे लक्ष्मण जगताप करणार मतदान, रूग्णवाहिकेतून मुंबईत

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

राज्यसभा निवडणुकीचा राज्यात धुरळा उडाला आहे. एक-एक मत खूप महत्त्वाचं आहे. राज्यसभेच्या राज्यातल्या पाच जागा फिक्स आहे. महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) विरूद्ध भाजप असा सामना आहे तरीही रंगत असणार आहे महत्त्वाची ठरणार आहे ती सहावी जागा. यासाठी शिवसेना तसंच भाजप या दोन्ही पक्षांनी उमेदवार दिला आहे. भाजपचे आमदार विधानभवनात दाखल झाले आहेत. अशात पुण्याचे भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप हे देखील मुंबईकडे रवाना झाले आहेत.

गंभीर आजाराने त्रस्त असलेले लक्ष्मण जगताप रूग्णवाहिकेतून निघाले असून मुंबईत येऊन ते मतदान करतील. निवडणुकीसाठी रूग्णवाहिकेतून येणारे ते पहिलेच आमदार ठरले आहेत. लक्ष्मण जगताप हे गेल्या काही दिवसांपासून त्रस्त आहेत. ते मतदानाला येणार की नाही हा प्रश्न उपस्थित होत होता. मात्र ते आता रूग्णवाहिकेतून येऊन मतदान करणार आहेत.

राज्यसभा निवडणूक शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांनी प्रतिष्ठेची केली आहे. या दोन्ही पक्षांमध्ये सहाव्या जागेसाठी चुरस रंगते आहे. एकीकडे कोर्टाने नवाब मलिक (Nawab Malik) आणि अनिल देशमुख यांना कोर्टाने मतदानाची संमती दिली नसल्याने महाविकास आघाडीला धक्का बसला. मात्र एमआयएमने पाठिंबा जाहीर केला आहे त्यामुळे आता एमआयएमची मतंही महाविकास आघाडीला मिळणार आहेत. भाजपनेही त्यांचे सगळे आमदार मतदानासाठी येतील याची काळजी घेतली आहे. लक्ष्मण जगताप हे रूग्णवाहिकेतून मुंबईला येत आहेत.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

पिंपरी चिंचवड मतदार संघाचे भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांची प्रकृती खालावल्याने त्यांना एप्रिल महिन्यात रूग्णालयात दाखल करण्यात आलं. सुमारे दीड महिना त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांना २ जूनला डिस्चार्ज देण्यात आला. त्यांना राज्यसभा निवडणुकीसाठी एअर अंब्युलन्सने आणलं जाईल अशी चर्चा होती. मात्र डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानंतर हा निर्णय बदलण्यात आला. त्यांना रस्ता मार्गे मुंबईत आणलं जातं आहे. ते रूग्णवाहिकेतून येऊन मतदान करतील आणि त्यानंतर पुण्याला जातील असंही समजतं आहे. त्यांच्यासोबत त्यांचे भाऊ शंकर जगतापही आहेत.

संपूर्ण राज्याचं तसंच देशाचं लक्ष लागलेली राज्यसभा निवडणूक आज पार पडते आहे. राज्यात निवडणुकीचा धुरळा उडाला आहे. सहा जागांसाठी मतदान होणार आहे. यामध्ये भाजपचे दोन, शिवसेना एक, राष्ट्रवादी एक आणि काँग्रेस एक असे उमेदवार निवडून येतील हे निश्चित आहे. मात्र सहाव्या जागेसाठी चुरस रंगणार आहे. भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी या जागेसाठी उमेदवार दिला आहे.

ADVERTISEMENT

आज पार पडत असलेल्या या मतदानासाठी क्रॉस व्होटिंग किंवा मतं फुटू शकतात ही भीती सगळ्याच पक्षांना आहे. त्यामुळे शिवसेनेने पक्षातल्या आमदारांना व्हीप जारी केला आहे. प्रत्येक पक्ष खबरदारी घेताना दिसतो आहे. त्यामुळेच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना तसंच भाजपने आपल्या आमदारांना मुंबईतल्या पंचतारांकित हॉटेल्समध्ये ठेवलं होतं. काही वेळेपूर्वी मतदानाची प्रक्रिया सुरू झाली आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT