‘राणे तुला पूर्ण नागडा करीन…’, राऊतांच्या संयमाचा स्फोट; काय घडलं?

मुंबई तक

Sanjay Raut venomous criticizing narayan rane: मुंबई: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणेंवर प्रचंड जहरी टीका केली आहे. यावेळी संजय राऊत प्रचंड संतापलेले दिसून आले. ‘नारायण राणे माझ्या नादाला लागू नकोस.. झालं आता. मी कालपर्यंत गप्प होतो. यापुढे जर तो बोलत राहिला तर मी त्याला […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

Sanjay Raut venomous criticizing narayan rane: मुंबई: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणेंवर प्रचंड जहरी टीका केली आहे. यावेळी संजय राऊत प्रचंड संतापलेले दिसून आले. ‘नारायण राणे माझ्या नादाला लागू नकोस.. झालं आता. मी कालपर्यंत गप्प होतो. यापुढे जर तो बोलत राहिला तर मी त्याला पूर्ण नागडा करेन.’ अशी घणाघाती टीका संजय राऊत यांनी यावेळी केली आहे. (sanjay rauts burst of patience criticizing narayan rane with venomous words what exactly happened)

पाहा संजय राऊत नेमकं काय म्हणाले:

‘अरे पादरा पावटा रे तो.. बाळासाहेबाच्या भाषेत.. पादरा आहे तो आतापर्यंत मी त्याच्याविषयी काही बोललो नाही. सगळ्यांना अरे-तुरे करतो. हा कोण आहे? मुख्यमंत्र्यांना अरे-तुरे… कालपर्यंत एकनाथ शिंदेंना अरे-तुरे करत होता. जुने काढा व्हिडीओ… मोदींना अरे-तुरे.. हे कोण आहेत. याची चौकशी करा. आता मी करणार..’

‘कालपर्यंत मी संयमाने वागलो, इतके वर्ष मी संयमाने वागलो. पण तुम्ही जर रोज आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आम्ही सगळे फडणवीस, अशोक चव्हाण, अहमद पटेल, सोनिया गांधी त्यानंतर मोदी सगळ्यांवर अरे-तुरे.. कोण तुम्ही’

‘…आणि मग मी दाखवतो’, संतापलेल्या संजय राऊतांचं नारायण राणेंना चॅलेंज

हे वाचलं का?

    follow whatsapp