भाजपचा विजय अन् महाविकास आघाडीचा पराभव : राष्ट्रवादीचा नेता तुफान नाचला…

ADVERTISEMENT

Satara APMC Election Result Update News
Satara APMC Election Result Update News
social share
google news

सातारा : राज्यभरात आज (29 एप्रिल) कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांचे (APMC Election Result) निकाल जाहीर झाले. यात काही ठिकाणी महाविकास आघाडी, काही ठिकाणी भाजप-शिवसेना युती तर काही ठिकाणी स्थानिक आघाड्यांना यश मिळालं आहे. काही ठिकाणी पक्षभेद विसरुनही नेते एकत्र आल्याच दिसून आलं. अमरावतीमध्ये राष्ट्रवादीचा पराभव करण्यासाठी वरुड आणि मोर्शीमध्ये भाजप-काँग्रेस एकत्र आले होते. असचं काहीस चित्र साताऱ्यातही पाहायला मिळालं. (Satara APMC Election Result Update News)

जावळी-महाबळेश्वर कृषी उत्पन्न बाजार समिती निडणुकीत भाजपचे सातारा-जावळीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या नेतृत्वातील पॅनेलचा मोठ विजय झाला. शेतकरी विकास पॅनलने 12 जागांवर विजय मिळविला तर महाविकास आघाडीच्या पॅनेलचा सुपडासाफ झाला. दरम्यान, भाजपच्या पॅनेलचा विजय अन् महाविकास आघाडीच्या पॅनेलचा पराभव असं चित्र असतानाही या निकालानंतर राष्ट्रवादीच्या एका नेत्याचा जल्लोष करताना आणि डान्स करतानाचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतं आहे. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे यांनी ‘अहो शेठ, लय दिवसानं झाली या भेट’ या लावणीवर तुफान डान्स केला.

म्हणून भाजपच्या विजयानंतरही राष्ट्रवादीच्या नेत्याने धरला ताल :

जावळी-महाबळेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजपचे आमदार शिवेंद्रराजे भोसले, राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे आणि मकरंद पाटील यांनी एकत्र येत पॅनेल उभे केले होते. राष्ट्रवादीचे 2 आमदार आणि भाजपचा 1 आमदार अशी झालेली ही युती महाविकास आघाडीच्या पॅनलला जोरदार धक्का देऊन गेली. या पॅनेलचे सुत्रधार शिवेंद्रराजे भोसले असल्याच बोललं जात आहे. या युतीच्या माध्यमातून साताऱ्यात प्रथमच वेगळं राजकीय समीकरण पहायला मिळालं होते.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Maharashtra APMC Election Result LIVE: महाराष्ट्रात बाजार समितींवर कोणाचा झेंडा?, निकालाचा धुरळा

तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या पॅनेलमध्ये राष्ट्रवादीचे नेते दीपक पवार, शिवसेना (ठाकरे गट) माजी आमदार सदाशिव सपकाळ आणि शिवसेना (शिंदे गट) नेते संदीप पवार यांनी रणनीती आखली होती. मात्र राष्ट्रवादीच्या 2 आणि भाजपच्या एका आमदाराने एकत्र येत महाविकास आघाडीच्या पॅनेलचा सुपडा साफ केला आहे. तसंच या निमित्ताने आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी आगामी काळातील विधानसभेच्या निवडणुकीसाठी पक्की मोर्चेबांधणी केली असल्याची चर्चा आहे.

विजयी उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे :

  • राजेंद्र सखाराम भिलारे – 460
  • मच्छिंद्र लक्ष्मण मुळीक – 533
  • प्रमोद बाजीराव शेलार – 537
  • हनुमंत सहदेव शिंगटे – 543
  • जयदीप शिवाजी शिंदे – 531
  • प्रमोद शंकर शिंदे – 535
  • हेमंत हिंदुराव शिंदे – 530
  • गुलाब विठ्ठल गोळे – 832
  • बुवासाहेब एकनाथराव पिसाळ – 821

    follow whatsapp

    ADVERTISEMENT