केंद्रीय मंत्र्यांना निमंत्रण देणार का?, शरद पवारांनी सीतारामन यांना दाखवली जागा?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पुणे: भारतीय जनता पक्षानं देशात मिशन २०२४ सुरु केलं आहे. यामध्ये राज्यातील १६ मतदार संघ भाजपने निवडले आहेत. केंद्रीय मंत्री मतदार संघात येऊन तीन दिवस दौरे करणार आहेत. यामध्ये राष्ट्रवादीचे चार मतदार संघ भाजपच्या रडारवरती आहेत. ते म्हणजे बारामती, शिरुर, सातारा, रत्नागिरी या मतदार संघामध्ये भाजप प्रभारी पाठवणार आहेत. यामध्ये बारामती हा पवारांचा बालेकिल्ला समजला जातो. निर्मला सितारामन बारामतीमध्ये येणार आहेत असा प्रश्न शरद पवारांना विचारला असता पवारांनी एका वाक्यात प्रश्नाचं उत्तर दिलं आहे.

शरद पवार काय म्हणाले?

वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्यामुळे सध्या वातावरण तापले आहे. यावरती आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी शरद पवारांनी आज पत्रकार परिषद घेतली होती. बारामती-शिरुर लोकसभा मतदार संघात केंद्रीय मंत्री दौरा करणार आहेत या प्रश्नावर पवार म्हणाले, ‘त्यांचं स्वागत आहे’. प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. केंद्रीय मंत्री येणार आहेत ही चांगली गोष्ट आहे असंही शरद पवार म्हणाले.

केंद्रीय मंत्र्यांना निमंत्रण देणार आहात का? शरद पवार म्हणाले…

केंद्रीय मंत्र्यांना निमंत्रण देणार आहात का? या प्रश्नावर शरद पवारांनी त्यांच्या शैलीत उत्तर दिले आहे. ते म्हणाले ”मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना आमंत्रीत केले होते. त्या लेव्हलच्या लोकांना मी आमंत्रीत केले होते. यांना कशाला निमंत्रण देऊ.” तसेच निर्मला सितारामन या बारामतीच्या जनतेशी संवाद साधतील. त्यांची भाषा बारामतीच्या जनतेला सहज समजेल, असा टोलाही पवारांनी लगावला आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

बारामती-शिरुरसाठी भाजपचं मायक्रो प्लॅनिंग

भाजपच्या राज्यातील मिशन ४५ मध्ये बारामती-शिरुर हे मतदार संघ आहे. बारामतीमध्ये राष्ट्रवादीचा बोलबाला आहे तर शिरुरमध्ये मागची निवडणूक सोडली तर शिवसेनेचे खासदर होते. बारामतीमध्ये सुप्रिया सुळे खासदार आहेत तर शिरुरमध्ये अमोल कोल्हे खासदार आहेत. येत्या २३ तारखेला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन बारामती दौऱ्यावर आहेत. तर केंद्रीय राज्य मंत्री रेणुका सिंग या आजपासून शिरुर दौऱ्यावरती आहेत. या दोन्ही मतदार संघामध्ये भाजपचं मायक्रो प्लॅनिंग सुरू आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT