शरद पवारचं राहणार राष्ट्रवादीचे अध्यक्ष! बैठकीआधी मोठी अपडेट समोर

मुंबई तक

ADVERTISEMENT

Sharad Pawar's resignation will be rejected ncp leader praful patel give big information
Sharad Pawar's resignation will be rejected ncp leader praful patel give big information
social share
google news

Sharad Pawar resignation will be rejected : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) अध्यक्ष पदावरून पायउतार झाले होते. यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी राजीनामा मागे घेण्याची मागणी केली होती. मात्र शरद पवार राजीनाम्यावर ठाम होते. आज वाय.बी.सेंटरमध्ये 5 मे रोजी अध्यक्ष निवड समितीची बैठक होणार आहे. या बैठकीत शरद पवार यांच्या राजीनाम्यावर चर्चा होणार आहे. मात्र बैठकीपूर्वीच मोठी अपडेट समोर आली आहे. अध्यक्ष निवड समितीच्या बैठकीत शरद पवार यांचा राजीनामा फेटाळण्याचा प्रस्ताव ठेवण्यात येणार आहे.राष्ट्रवादीच्या प्रफुल पटेल (Praful Patel) यांनीच याबाबतची माहिती दिली आहे. (Sharad Pawar’s resignation will be rejected ncp leader praful patel give big information before meeting)

वाय. बी.सेंटरमध्ये आज अध्यक्ष निवड समितीच्या बैठकीत शरद पवार (Sharad Pawar) यांच्या राजीनाम्यावर चर्चा होणार आहे. या बैठकीत शरद पवार यांचा राजीनामा फेटाळण्याचा प्रस्ताव ठेवण्यात येणार असल्याची माहिती प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांनी इंडिया टूडेला दिली आहे. विशेष म्हणजे प्रफुल्ल पटेल स्वतः पवारांचा राजीनामा फेटाळण्याचा प्रस्ताव पुढे करणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे आता शरद पवार पक्षाच्या अध्यक्षपदी कायम राहण्याची शक्यता आहे. मात्र अध्यक्ष निवड समितीच्या बैठकीतून येणाऱ्या निकालानंतरच यावर शिक्कामोर्तब होणार आहे.

हे ही वाचा : शरद पवारच राष्ट्रवादीचे अध्यक्ष राहणार, राजीनाम्याच्या निर्णयावर यू-टर्न?

राज्यातल्या आणि देश पातळीवरच्या इतर नेत्यांनीही शरद पवारांशी राजीनामा मागे घेण्याबद्दल बोलणं झालंय. त्यामुळे आजच्या बैठकीत आम्ही फक्त आज शरद पवारांनी आपला निर्णय मागे घ्यावा अशी मागणी करणार आहोत. व्यतिरिक्त इतर कुठला अजेंडा नसणार आहे. तसेच दुसऱ्या अध्यक्षाबाबत कुठलीही चर्चा आज होणार नसल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते पी सी चाको यांनी दिली.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

शरद पवार (Sharad Pawar) यांनी राजीनामा दिल्यानंतर आमची जी कमिटी नेमली. या कमिटीने वेगवेगळे पर्याय शोधण्याचा प्रयत्न केला. परंतू देशातील सर्व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते, महाराष्ट्रातील नेते, शरद पवारांनीच अध्यक्षपदी कायम राहाव असा आग्रह धरला. त्यामुळे आजच्या अध्यक्ष निवड समितीच्या बैठकीमध्ये सुद्धा शरद पवारच राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी राहाव असा ठराव आम्ही मंजूर करणार आहोत, आणि शरद पवारच अध्यक्षपदी कायम राहावा असा आग्रह धरणार आहोत, अशी राष्ट्रवादीचे नेते छगन भूजबळ (Chhagan Bujbal) यांनी पत्रकारांना प्रतिक्रिया दिली आहे.

हे ही वाचा : कात्रजचा घाट, तेल लावलेला पैलवान.. ‘पॉवर’फुल पवारांचे प्रचंड इंटरेस्टिंग किस्से!

राज्यातल्या आणि देश पातळीवरच्या इतर नेत्यांनीही शरद पवारांशी राजीनामा मागे घेण्याबद्दल बोलणं झालंय. त्यामुळे आजच्या बैठकीत आम्ही फक्त आज शरद पवारांनी आपला निर्णय मागे घ्यावा अशी मागणी करणार आहोत. व्यतिरिक्त इतर कुठला अजेंडा नसणार आहे. तसेच दुसऱ्या अध्यक्षाबाबत कुठलीही चर्चा आज होणार नसल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते पी सी चाको (P C Chacko) यांनी दिली.

ADVERTISEMENT

दरम्यान आता बैठकीपूर्वी राष्ट्रवादीच्या अनेक नेते शरद पवारांचा राजीनामा मागे घेण्यावर ठाम आहेत. त्यामुळे आता बैठकीतून काय निर्णय समोर येतो, याकडे संपूर्ण महाराष्ट्र आणि देशाचे लक्ष लागले आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT