NCP: शरद पवारच राष्ट्रवादीचे अध्यक्ष राहणार, राजीनाम्याच्या निर्णयावर यू-टर्न?

मुंबई तक

ADVERTISEMENT

sharad pawar will be the president of ncp he spoke clearly about resignation
sharad pawar will be the president of ncp he spoke clearly about resignation
social share
google news

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी पक्षाच्या अध्यक्षपद सोडण्याचा निर्णय जाहीर केल्यापासून संपूर्ण पक्षात खळबळ माजली आहे. गेल्या तीन दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे हजारो कार्यकर्ते शरद पवारांनी आपला निर्णय बदलावा यासाठी वाय. बी. सेंटर बाहेर बसून वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करत आहेत. अखेर कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन स्वत: शरद पवार यांनी सेंटर बाहेर येऊन एक मोठं वक्तव्य केलं आहे. ज्यामुळे पवार आता आपला राजीनामा (Resignation) मागे घेणार असल्याचे संकेत मिळत आहेत. (sharad pawar will be the president of ncp he spoke clearly about resignation)

‘कार्यकर्त्यांच्या मनातील जी भावना आहे ती दुर्लक्षित केली जाणार नाही. एवढंच मी या ठिकाणी आता सांगतो. दोन दिवसानंतर तुम्हाला असं बसावं लागणार नाही ही खात्री तुम्हाला देतो.’ असं शरद पवार यावेळी म्हणाले. त्यांच्या याच वक्तव्यामुळे असे संकेत मिळत आहेत की, शरद पवार हे कार्यकर्त्यांच्या रेट्यामुळे आपला निर्णय मागे घेऊ शकतात. त्यामुळे तेच अध्यक्षपदी कायम राहण्याचीही शक्यता आहे.

पाहा वाय. बी. सेंटरबाहेर येऊन शरद पवार नेमकी काय केली घोषणा:

‘पक्षातील सर्व कार्यकर्त्यांच्या तीव्र भावना आहेत. त्या तुमच्या रुपाने व्यक्त होत आहेत. कालही व्यक्त झाली.. आजही तुम्हाला बघितल्यावर लक्षात आलं की, तुम्ही काही फक्त मुंबईतून आलात असं नाही. महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यातून आला आहात. मी जो काही निर्णय घेतला तो पक्षाच्या भविष्यासाठी घेतला. पुढे पक्षाचं काम कसं चालावं.’

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

‘ही गोष्ट खरी आहे की, असे निर्णय घेताना सहकाऱ्यांसोबत विचार-विनिमय करण्याची आवश्यकता असते. मी त्याचा विचार केला. पण मला एक खात्री होती की, तुम्हा लोकांशी चर्चा केली असती तर तुम्ही मला कधी होय म्हणाला नसता.’ असं पवार यावेळी म्हणाले.

ADVERTISEMENT

दोन दिवसानंतर तुम्हाला असं बसावं लागणार नाही’

‘त्यामुळे तुम्हाला विश्वासात घेऊन निर्णय घेण्याची आवश्यकता होती. ती त्यावेळी माझ्याकडून घेतली गेली नाही. पण त्यामगाचा हेतू काय होता हा मी तुम्हाला सांगितला. आता हा जो निर्णय घेतलाय त्यासाठी महाराष्ट्राच्या बाहेरुन अनेक तुमचे सहकारी या ठिकाणी आले आहेत. माझ्याशी उद्या त्यांना बोलायचं आहे. माझी आणि त्यांची बैठक उद्या संध्याकाळपर्यंत होईल.’

‘ती झाल्यानंतर जी काही तुम्हा सगळ्यांची भावना आहे ती नजरेसमोर ठेवून बाहेरून आलेल्या सहकाऱ्यांना विश्वासात घेऊन अंतिम निर्णय हा येत्या एक-दोन दिवसात जाहीर करण्याची भूमिका घेऊ. पण ती घेत असताना कार्यकर्त्यांच्या मनातील जी भावना आहे ती दुर्लक्षित केली जाणार नाही. एवढंच मी या ठिकाणी आता सांगतो. दोन दिवसानंतर तुम्हाला असं बसावं लागणार नाही ही खात्री तुम्हाला देतो.’

शरद पवार यांच्या याच वक्तव्यामुळे आता ते आपला निर्णय मागे घेऊ शकतात असा अंदाज वर्तवला जात आहे. मात्र, तरीही जोवर शरद पवार हे आपला अंतिम निर्णय जाहीर करत नाहीत तोपर्यंत राष्ट्रवादीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांचं पुढील सर्व घडामोडींकडे लक्ष लागून राहिलं आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT