अर्जुन खोतकर ईडीच्या दबावामुळे शिंदे गटात गेले का?; काय म्हणाले शिवसेना उपनेते?
काही दिवसांपूर्वी आदित्य ठाकरेंच्या शिव संवाद यात्रेत दिसलेले आणि बंडखोरांविरोधात दंड थोपटणारे शिवसेनेचे उपनेते अर्जून खोतकरांनी सगळ्यांनाच धक्का दिला. दिल्लीत गेलेल्या अर्जून खोतकरांचा थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि रावसाहेब दानवेंसोबतचाच फोटो समोर आला. त्यानंतर आता अर्जून खोतकर ईडीच्या दबावामुळे शिंदे गटात दाखल झाल्याचं बोललं जात आहे. अर्जून खोतकर ईडीच्या दबावामुळे शिंदे गटात गेल्याची चर्चा का […]
ADVERTISEMENT

काही दिवसांपूर्वी आदित्य ठाकरेंच्या शिव संवाद यात्रेत दिसलेले आणि बंडखोरांविरोधात दंड थोपटणारे शिवसेनेचे उपनेते अर्जून खोतकरांनी सगळ्यांनाच धक्का दिला. दिल्लीत गेलेल्या अर्जून खोतकरांचा थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि रावसाहेब दानवेंसोबतचाच फोटो समोर आला. त्यानंतर आता अर्जून खोतकर ईडीच्या दबावामुळे शिंदे गटात दाखल झाल्याचं बोललं जात आहे.
अर्जून खोतकर ईडीच्या दबावामुळे शिंदे गटात गेल्याची चर्चा का सुरू झालीये?
शिवसेनेत बंडखोरी झाली, त्यानंतर तीन दिवसानंतर म्हणजेच २४ जून रोजी जालना सहकारी साखर कारखान्याची जमीन, एक रेसिडेन्शियल प्लॅान्ट आणि एक बिल्डिंग व स्ट्रक्चर आदी संपत्तीवर ईडीकडून टाच आणण्यात आली. साखर कारखान्याची जप्त करण्यात आलेली जमीन २०० एकर इतकी आहे.
शिंदे गटात गेलेल्या आमदार आणि खासदारांविरुद्ध ईडीचा तपास सुरू आहे. यात यशवंत जाधव, यामिनी जाधव, प्रताप सरनाईक, भावना गवळी यांच्यासह अनेक नेत्यांचा समावेश आहे. एकनाथ शिंदे यांचं सरकार अस्तित्वात आल्यानंतर आमदार भास्कर जाधव यांनी थेट नाव घेत ईडीच्या दबाव टाकल्याचा आरोप केला होता. त्याचबरोबर राजकीय वर्तुळातही अशीच चर्चा सुरू आहे.
दानवे-खोतकरांची दिलजमाई! अर्जुन खोतकर शिंदे गटात