Shiv Sena vs MNS: ‘देशातील एकमेव भाडोत्री पक्ष म्हणजे मनसे’, शिवसेना नेत्याची घणाघाती टीका
राकेश गुडेकर/भरत केसरकर, रत्नागिरी-सिंधुदुर्ग: ‘राज ठाकरे हे एक करमणुकीचे केंद्र आहे, आणि त्यांचा मनसे पक्ष हा भाडोत्री पक्ष आहे, मनसे हा देशातील एकमेव भाड्याचा पक्ष आहे.’ अशी घणाघाती टीका शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी केली आहे. ‘बंधू उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आहेत. ते उत्तम काम करत आहेत. हे राज ठाकरे यांना पाहवत नाही. याबाबत देखील त्यांना […]
ADVERTISEMENT

राकेश गुडेकर/भरत केसरकर, रत्नागिरी-सिंधुदुर्ग: ‘राज ठाकरे हे एक करमणुकीचे केंद्र आहे, आणि त्यांचा मनसे पक्ष हा भाडोत्री पक्ष आहे, मनसे हा देशातील एकमेव भाड्याचा पक्ष आहे.’ अशी घणाघाती टीका शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी केली आहे.
‘बंधू उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आहेत. ते उत्तम काम करत आहेत. हे राज ठाकरे यांना पाहवत नाही. याबाबत देखील त्यांना बंधूद्वेष असून त्यातून हा थयथयाट सुरु आहे.’ अशी देखील बोचरी टीका खासदार विनायक राऊत यांनी केली आहे. ते आज (3 मे) रत्नागिरीत बोलत होते.
आज रत्नागिरीत त्यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. तसेच अक्षय तृतीयेच्या देखील शहरातील नागरिकांना शुभेच्छा दिल्या, त्यानंतर पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला.
यावेळी राऊत म्हणाले की, ‘कायदा आणि सुव्यवस्था बघडविण्याचा डाव मनसे आणि भाजपचा आहे. पण त्याला महाराष्ट्रची जनता भीक घालणार नाही.’ अशीही टीका देखील विनायक राऊत यांनी भोंगाप्रश्नी केली आहे.