दीपक केसरकर ते शंभूराज देसाई… बंडखोरीत दिली साथ, एकनाथ शिंदेंनी अशी केली परतफेड!
भाजप-शिंदे गटाने सरकार स्थापन केलं. त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार झाला आणि खातेवाटपही झालं. या सगळ्यात एकनाथ शिंदे यांच्याकडून शिवसेनेविरोधात बंडखोरी करणाऱ्या आमदारांवर विशेष लक्ष दिलं जात असल्याचं दिसतंय. बंडखोरीत सुरूवातीपासून साथ देणाऱ्या आमदारांची मर्जी शिंदेंकडून पालकमंत्री पदाच्या नियुक्त्या करताना राखली गेल्याचंच दिसतंय. यात दीपक केसरकरांपासून ते शंभूराज देसाईपर्यंत अनेकांचा समावेश आहे. एकनाथ शिंदेंनी शिवसेनेविरोधात बंडखोरी केली. […]
ADVERTISEMENT

भाजप-शिंदे गटाने सरकार स्थापन केलं. त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार झाला आणि खातेवाटपही झालं. या सगळ्यात एकनाथ शिंदे यांच्याकडून शिवसेनेविरोधात बंडखोरी करणाऱ्या आमदारांवर विशेष लक्ष दिलं जात असल्याचं दिसतंय. बंडखोरीत सुरूवातीपासून साथ देणाऱ्या आमदारांची मर्जी शिंदेंकडून पालकमंत्री पदाच्या नियुक्त्या करताना राखली गेल्याचंच दिसतंय. यात दीपक केसरकरांपासून ते शंभूराज देसाईपर्यंत अनेकांचा समावेश आहे.
एकनाथ शिंदेंनी शिवसेनेविरोधात बंडखोरी केली. शिंदेंच्या बंडखोरीला शिवसेनेतल्या अनेक आमदारांनी साथ दिली. यात दीपक केसरकरांपासून ते उदय सामंत यांच्यापर्यंत अनेकांचा समावेश आहे. शिंदेंनी ४० आमदारांना सोबत घेत भाजपसोबत घरोबा केला आणि सरकार स्थापन केलं. त्यानंतर बंडात साथ देणाऱ्या या आमदारांची मर्जी शिंदेंकडून राखली जात असल्याचंच दिसतंय.
दीपक केसरकर मुंबई शहराचे पालकमंत्री
शिंदेंनी बंड केल्यानंतर शिंदे गटाची भूमिका मांडण्याचं काम केलं ते दीपक केसरकर यांनी. दीपक केसरकर हे शिंदे गटाचे प्रवक्ते झाले. शिंदे गटात मंत्रिमंडळात तीव्र स्पर्धा असताना दीपक केसरकरांना छोटेखानी मंत्रिमंडळ विस्तारात संधी दिली गेली. त्यानंतर आता पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या करताना दीपक केसरकर यांना थेट मुंबई शहराच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आलीये. इतकंच नाही, तर विधानसभा पोटनिवडणुकीमुळे कोल्हापुरातील स्थानिक पदाधिकारी नाराज झाले होते, तिथलं पालकमंत्री पदही केसरकरांकडे सोपवलं गेलंय. केसरकरांकडे पालकमंत्री पद देऊन शिंदेंनी मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वाचं पाऊल टाकलंय.
शंभूराजे देसाईंवर साताऱ्याबरोबर ठाण्याची जबाबदारी
माजी गृह राज्यमंत्री शंभूराज देसाईही शिंदेंच्या बंडात सामील झाले. शंभूराज देसाईंना मंत्रिमंडळात स्थान मिळालं, पण खातं मात्र मनासारखं मिळालं नाही, असं बोललं गेलं. खाते वाटपामुळे शंभूराज देसाईंची नाराजी शिंदेंनी पालकमंत्री पद देऊन दूर केलीये. शंभूराज देसाई सुरुवातीपासूनच सातारा जिल्ह्याच्या पालकमंत्री पदासाठी आग्रही होते. शिंदेंनी सातारा जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाबरोबरच ठाण्याचं पालकमंत्रीपदही देसाईंकडे देऊन विश्वास टाकलाय.