फडणवीस आणि त्यांचे सर्वच बापजादे महाराष्ट्राचा लचका तोडण्याचे स्वप्न पाहत होते: सामना
मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मुंबईतील सभेनंतर भाजपचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी दुसऱ्याच दिवशी उत्तर भारतीयांच्या एका सभेतून शिवसेनेवर हल्ला चढवला होता. यावेळी त्यांनी शिवसेनेला जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं. ज्यानंतर आता शिवसेनेने आपलं मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून फडणवीस आणि भाजपवर तुफान टीका केली आहे. ‘शिवसेनेने बलिदाने दिली व समस्त ठाकरे कुळाने वाघाच्या छातीने संघर्ष […]
ADVERTISEMENT

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मुंबईतील सभेनंतर भाजपचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी दुसऱ्याच दिवशी उत्तर भारतीयांच्या एका सभेतून शिवसेनेवर हल्ला चढवला होता. यावेळी त्यांनी शिवसेनेला जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं. ज्यानंतर आता शिवसेनेने आपलं मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून फडणवीस आणि भाजपवर तुफान टीका केली आहे.
‘शिवसेनेने बलिदाने दिली व समस्त ठाकरे कुळाने वाघाच्या छातीने संघर्ष केला म्हणून आज मुंबईसह महाराष्ट्र दिल्लीपुढे न झुकता उभा आहे. फडणवीस व त्यांचे सर्वच बापजादे महाराष्ट्राचा लचका तोडण्याचे स्वप्न पाहत होते, तेव्हा ‘ठाकरे’ अखंड महाराष्ट्रासाठी वाघाचे पंजे मारीत होते.’ अशा शब्दात शिवसेनेने देवेंद्र फडणवीस आणि भाजपला सुनावले आहे.
पाहा सामनाच्या अग्रलेखातील महत्त्वाचे मुद्दे:
-
शिवसेनेने बलिदाने दिली व समस्त ठाकरे कुळाने वाघाच्या छातीने संघर्ष केला म्हणून आज मुंबईसह महाराष्ट्र दिल्लीपुढे न झुकता उभा आहे. फडणवीस व त्यांचे सर्वच बापजादे महाराष्ट्राचा लचका तोडण्याचे स्वप्न पाहत होते, ‘महाराष्ट्र दिनी’ दंडास काळय़ा फिती बांधून 105 हुतात्म्यांचा अपमान करीत होते तेव्हा ‘ठाकरे’ अखंड महाराष्ट्रासाठी वाघाचे पंजे मारीत होते.