Rajan Salavi: ”बाळासाहेबांच्या समाधीवर नतमस्तक होण्याचा त्यांना नैतिक अधिकार नाही”

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

राकेश गुडेकर

रत्नागिरी: शिवसेनेच्या धनुष्यबाणावर निवडून आलेल्या या मंडळींना शिवसेनाप्रमुखांच्या समाधीवर नतमस्तक होण्याचा नैतिक अधिकार नाही, अशी टीका शिवसेनेचे उपनेते आमदार राजन साळवी यांनी शिंदे गटातील मंत्र्यांवर केली आहे. ते आज रत्नागिरीत बोलत होते. राज्यात सत्तांतर घडल्यानंतर तब्बल 39 दिवसानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. शिंदे गटातील आणि भाजपमधील प्रत्येकी 9 मंत्र्यांनी शपथ घेतली.

बंडखोरांबद्दल काय म्हणाले राजन साळवी?

दरम्यान शिंदे गटातील नवनियुक्त मंत्र्यांनी आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवाजी पार्कवरील स्मृतिस्थळाला भेट देऊन अभिवादन केले. दरम्यान यावरूनच या मंत्र्यांवर शिवसेना उपनेते आमदार राजन साळवींनी जोरदार टीका केली आहे. राजन साळवी यांनी म्हटलं आहे की, वंदनीय बाळासाहेब ठाकरे हे संपूर्ण जगाचं दैवत आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

शिवसेना प्रमुखांचे पुत्र या राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांना पण लोकांनी ज्या पद्धतीने नामुष्की निर्माण करून खुर्चीवरून खाली उतरवलं, हे दुःख या लोकांनी वंदनीय शिवसेनाप्रमुखांना आणि पक्षाप्रमुखांना दिलेलं आहे, त्यामुळे शिवसेनेच्या धनुष्यबाणावर निवडून आलेल्या या मंडळींना शिवसेनाप्रमुखांच्या समाधीवर नतमस्तक होण्याचा नैतिक अधिकार नाही, अशी टीका शिवसेनेचे उपनेते आमदार राजन साळवी यांनी केली आहे.

कोकणात शिवसेनेचाच भगवा फडकेल- राजन साळवी

2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने भाजपने तयारी सुरू केली आहे. याचाच एक भाग म्हणून भाजपचे केंद्रीय गृह राज्यमंत्री आजपासून सिंधुदुर्ग-रत्नागिरीच्या दौऱ्यावर आहेत, याबाबत बोलताना राजन साळवी म्हणाले की, भाजपने लोटस-फोकस काहीही करू दे कोकणात शिवसेनेचाच भगवा फडकेल. दरम्यान मंत्रिमंडळ विस्ताराला एवढा वेळ लागला आता बहुदा खाती वाटपासाठी एवढाच वेळ लागेल अशी टीका राजन साळवी यांनी केली आहे.

ADVERTISEMENT

”तो आमचा हक्क होता, तो आम्ही घेतला”

शिवसेनेने विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी अंबादास दानवे यांची नियुक्ती केली आहे. यावर काँग्रेसने आक्षेप घेतला आहे, यावर बोलतान राजन साळवी म्हणाले ”ज्यांचे संख्याबळ जास्त आहे त्यांचा विरोधी पक्ष नेता असतो. त्यानुसार विधान परिषदेमध्ये विरोधी पक्ष नेते पद शिवसेनेकडे आलं आहे, तो आमचा हक्क होता, आणि तो हक्क आम्ही घेतला.”

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT