योगींच्या टकल्याला शाई लावायला अयोध्येत जाताय का? भास्कर जाधवांचा राज ठाकरेंना बोचरा सवाल
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या 1 मे रोजी औरंगाबाद येथे होणाऱ्या सभेकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. गुढीपाडव्याच्या सभेपासून राज ठाकरेंनी भाजपसाठी नरमाईची भूमिका घेत शिवसेनेला धारेवर धरायला सुरुवात केली आहे. शिवसेना प्रवक्ते आणि आमदार भास्कर जाधव यांनी राज ठाकरेंच्या नवीन भूमिकेवर टीका करताना, राज आता अयोध्येला जाऊन योगींच्या टकल्यावर शाई लावणार आहेत का? असा […]
ADVERTISEMENT

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या 1 मे रोजी औरंगाबाद येथे होणाऱ्या सभेकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. गुढीपाडव्याच्या सभेपासून राज ठाकरेंनी भाजपसाठी नरमाईची भूमिका घेत शिवसेनेला धारेवर धरायला सुरुवात केली आहे. शिवसेना प्रवक्ते आणि आमदार भास्कर जाधव यांनी राज ठाकरेंच्या नवीन भूमिकेवर टीका करताना, राज आता अयोध्येला जाऊन योगींच्या टकल्यावर शाई लावणार आहेत का? असा बोचरा सवाल विचारला आहे.
“राज ठाकरे हे परिवर्तनवादी नेते आहेत. परिवर्तनवादी अशाकरता कारण त्यांनी ज्यावेळी मनसेची स्थापना केली तेव्हाचा झेंडा, पक्ष आणि विचार एकदा आठवून पहा. यानंतर ते गुजरातला गेले, तिकडे जाऊन मोदींच्या आंघोळीचं पाणी राज्यातल्या नेत्यांनी प्यायला हवं इथपर्यंत त्यांची भाषा गेली. नंतर लाव रे तो व्हिडीओच्या माध्यमातून त्यांनी पुन्हा मोदींवर टीका केली. यानंतर त्यांनी पक्षाचा झेंडा बदलला. नंतर आदेश काढला की मला कोणीही हिंदुहृदयसम्राट म्हणायचं नाही, मराठीहृदयसम्राट म्हणा”.
औरंगाबादच्या सभेआधीच शरद पवारांचे राज ठाकरेंना तीन प्रश्न, म्हणाले….
सध्या राज ठाकरे मीच हिंदुहृदयसम्राट अशा तोऱ्यात त्यांची भाषणं सुरु आहेत. म्हणूनच राज ठाकरेंना मी परिवर्तनवादी भोंगा म्हणतो. त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज नाही. योगी आदित्यनाथ यांना राज ठाकरे गंजा म्हणजेच टकला म्हणाले होते. आता त्या टकल्यावर शाई लावायला ते अयोध्येला जात आहेत का? कोणत्या तोंडाने अयोध्येला जाऊन राज योगींचं कौतुक करणार आहेत. त्यांच्या टकल्यावर केस आले की काय हे पाहणार आहेत का? राज ठाकरेंकडे लक्ष देऊ नका. त्यांचा नाईलाज आहे, त्यांच्याकडे पर्याय नाहीये, म्हणून ते भाजपला मदत करतायत. काही वर्षांनी ते भाजपवर टीका करुन आपल्यालाही मदत करतील असं भास्कर जाधव म्हणाले.